महाराष्ट्र राज्यात नुकतेच माजी विधानसभा अध्यक्ष व काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या बुरा ना मानतो होली है ...!आमच्याकडे या दोघांनाही मुख्यमंत्री करतो या माजी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांना उद्देशून केलेल्या वक्तव्याने रंगाची धुळवड मात्र जोरात उडाली आहे.
या उलट प्रतिउत्तर देताना नाना पटोले यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे पलटवार करताना पटोले यांना उद्देशून म्हणाले बुरा ना मानो होली हैं...!
भगवा रंग ज्यांना आवडतो त्यांनीच आमच्या सोबत यावे असे आव्हान केले.
सध्या राज्यात अनेक ठिकाणी देव - देवतांच्या गाव यात्रा जत्रा यांच्या आगमनाची चाहूल लागली असल्याने अनेक ठिकाणी जाब- जबाब होत असतात अनेक ठिकाणी राज्यातल्या राजकारणाची परिस्थिती विषयी अनेक ठिकाणी स्थिरतेचा कौल देण्यात आला आहे परंतु सध्याच्या नाना पटोले यांच्या वक्तव्याने त्या स्थिरतेच्या राजकारणाला व्यक्त केलेल्या भाकणुकीला भेदण्याचा प्रयत्न केला आहे.
त्यातच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील माझ्यावर विश्वास ठेवू नका...? आशा केलेल्या
वक्तव्यामुळे त्यांची अनेक दिवसापासून पक्ष सोडण्याची चर्चा "रंगात- रंगून" गेली परंतु त्यांनीही माझ्यावर विश्वास ठेवू नका या शब्दाचा अर्थ मी कुठे कोणत्या दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार आहे असा होत नाही असाही खुलासा लगेच केला आहे.
म्हणजे सध्या महाराष्ट्र राज्यात होळी धुलवडीलाच एप्रिलफुल बनवत अनेक राजकीय रंगाने राजकीय नेते रंगोत्सव साजरा केला जात आहे व जनता त्याचा आनंद लुटत आहे. हे मात्र नक्की
0 Comments