दिनांक २१/१०/२०२५
लोकपर्व न्यूज नेटवर्क:-
विविध कारणामुळे सध्याची आर्थिक परस्थिती पाहील्यास मोठ्या प्रमाणात चढ उतार चालू आहे अर्थकारणाशिवाय कोणताही प्रश्न सुटत नाही प्रत्येकजन अर्थकारणाशी जोडला गेला आहे गरज ही शोधाची जननी आहे त्या नुसार अनेक कर्ज पुरवठा करणा-या संस्थांची नवनिर्मिती चालू आहे.
* प्राथमिक स्वरूपात लाभांश वाटप करताना संस्थेचे चेअरमन अॅड प्रतापराव मोरे व्हा. चेअरमन सचिन वाघमोडे जेष्ठ सभासद महादेव पवार, सुब्राव गायकवाड*
ग्रामिण भागातील कर्ज पुरवठा करणा-या विविध कार्यकारी सहकारी सोसायट्या हा त्याचाच भाग असून त्यांच्या पुढे कर्ज वसूली करणे हा महत्वाचा भाग बनला आहे त्यांच्यासह इतर कर्ज परवठा करणाऱ्या सहकारी संस्था ह्या सक्तीच्या कर्ज वसुली शिवाय वाढणार व टिकणार ही नाहीत आणि सभासदांना लाभांश लाभणार नाही असे मत पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक दिनकरराव मोरे यांनी व्यक्त केले.
ते चळे ता. पंढरपूर येथे चळे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी नंबर १ च्या वतीने दहा टक्के दराने होणाऱ्या लाभांश वाटप प्रसंगी अध्यक्षस्थानावरून व प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. त्यांनी तालुक्यातील सर्व सहकारी सोसायट्यांची वाटचालही मांडली.
"या पुढे सभासदांना संस्थेकडून लाभाची अपेक्षा ठेवायची असेल मुदतीत कर्जफेड हा एकमेव पर्याय व तारणहार आहे असेही सांगितले,,.
या वेळी संस्थेचे चेअरमन अॅड. प्रतापराव मोरे, व्हा.चेअरमन प्रा.सचिन वाघमोडे उपसरपंच दिपक मोरे, ग्रा.सदस्य अतुल मोरे, माजी चेअरमन उत्तम मोरे, उत्तम गायकवाड, गोरख वाघमोडे, पांडुरंग गायकवाड, महादेव व्यवहारे, रामचंद्र गायकवाड, माजी सरपंच बळीराम बनसोडे, औदुंबर मोरे आनंदा कांबळे सुब्राव गायकवाड, राजाराम वाघ, अर्जून शिंदे, उत्तम डोंगरे , महादेव वाघमोडे, महादेव पवार, कुबेर फुगारे, यशवंत खिलारे, आप्पासाहेब मोरे मच्छिंद्र जाधव, बाळु पाटील उपस्थीत होते. या वेळी दिपक मोरे , बंडु मोरे, प्रा.ज्ञानेश्वर वाघमोडे, सुधाकर मोरे, बालाजी फुगारे, यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक अतुल मोरे , आभार प्रा. सचिन वाघमोडे यांनी मानले.

0 Comments