दिनांक १४/०३/२०२५
लोकपर्व न्यूज नेटवर्क
पंढरपूर तालुक्यातील चळे येथील बळीरामदादा बनसोडे शिक्षणशास्त्र महाविद्यालय येथील प्राचार्य डॉ.शशिकांत तांबे , सहा. प्राध्यापक डॉ.महादेव होनकळस यांची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर येथे अभ्यासमंडळाच्या सदस्यपदी नुकतीच निवड करण्यात आली.
निवडीबद्दल प्राचार्य शशिकांत तांबे, प्राध्यापक होनकळस, पत्रकार स्वप्नील पोरे यांचा सत्कार करताना संस्थापक श्री बळीराम बनसोडे.
तर महाविद्यालयातील वरिष्ठ लिपिक स्वप्निल पोरे यांची माहिती अधिकार पत्रकार संरक्षण समितीच्या पंढरपूर तालुकाध्यपदी निवड करण्यात आल्याबद्दल महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष बळीरामदादा बनसोडे यांच्या हस्ते या सर्वांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी सोलापूर विद्यापीठाचे प्रभारी अधिष्ठाता प्राचार्य डॉ. राजशेखर हिरेमठ तसेच कस्तुरबाई कॉलेज ऑफ एज्युकेशनचे सहा.प्रा.डॉ. डी.एस. वाघमारे सर, स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्रा. जी.के. कोष्टी सर, तसेच बळीरामदादा बनसोडे शिक्षणशास्त्र महाविद्यालय व श्रीकृष्ण महाविद्यालयाचे सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments