LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

महा पुराने व अतिवृष्टीने नुकसान झालेल्यांना तातडीने मदत मिळावी :- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई

दिनांक ०१/१०/२०२५

लोकपर्व न्यूज नेटवर्क:-
सोलापूर जिह्यातील नद्यांना महापूर  व अतिवृष्टी ने शेती,  शेतीपिके, घरे व जनावरे यांचे मोठ्या प्रमाणात अतोनात अगणित  नुकसान झाले आहे. त्यांना शासनाने ताबडतोब ठोस मदत द्यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई च्या पंढरपूर येथील संघाच्या पदाधिकारी व सभासदांनी पंढरपूर तहसीलदारांना निवेदन देऊन केली आहे.

         अचानक व बेसावधपणे आलेल्या पुराने व अतिवृष्टीने शेतातील पिकां  बरोबरच शेत जमीन सुद्धा वाहून गेली आहे. तसेच घरांची पडझड होऊन घरातील अनधान्य, भांडी, कपड़े, मौल्यवान वस्तू सह जनावरे व शालेय विद्यार्थ्यांचे वह्या, पुस्तके, शैक्षणिक  साहित्य देखील वाहून गेले आहे. अनेक प्रकारचे नुकसान सध्या सर्वसामान्य नागरिकांना सहन करावे लागत आहे. तरी शासनाने त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी अपेक्षा सर्व स्तरातून व्यक्त होत आहे त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने सुद्धा आपला सहभाग नोंदवून मागणीस पाठिंबा दिला आहे
यावेळी म. रा.पत्रकार संघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेंद्र कोरके- पाटील, पंढरपूर शहर अध्यक्ष संतोष मोरे, ता. अध्यक्ष रवि कोळि, सचिव कुमार कोरे, प्रमोद भोसले, सुनिल अधटराव, संजय यादव व पत्रकार साळुंखे सह इतर पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments