दि.१७/१०/२०२५
चळे केंद्र शाळा व सिध्दनाथ वाचनालयाचा सहभाग
आकाश कंदिल कार्यशाळा
पंढरपूर तालुक्यातील चळे येथील सिद्धनाथ सार्वजनिक मुक्त वाचनालय चळे व जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त सुमारे २५१ वर्तमानपत्र वाचून वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.
वाचन प्रेरणा दिनानिमित्त माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या कार्याची संपूर्ण माहिती जिल्हा परिषद शाळेतील सहशिक्षक शशिकांत कांबळे व वाचनालयाचे अध्यक्ष अतुल मोरे यांनी विद्यार्थ्यांना सांगून वाचनाचे महत्त्व पटवून दिले त्याचबरोबर दिवाळीच्या सुट्टीनंतर वाचनालयाच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांसाठी वाचन स्पर्धा घेण्यात येऊन विद्यार्थ्यांना उत्कृष्ट वाचन करणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य ती बक्षिसे वाचनालयाच्या वतीने देण्यात येणार असल्याचे जाहीर केले.
त्याचबरोबर चळे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेच्या वतीने विद्यार्थ्यासाठी आकाश कंदील बनवणे या वर कार्यशाळा त्याचबरोबर चित्रकला स्पर्धा ,रंगभरण स्पर्धा घेण्यात येऊन सुट्टी पूर्वीच विद्यार्थ्यांना दिवाळीचा फराळ ही वाटप करण्यात आला विद्यार्थ्यांनी त्याचा आस्वाद घेतला.
स्वच्छता संदेश श्रमदानाचे महत्त्व यावर विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून स्वच्छता पाळा.. आरोग्याचे आजार टाळा,. घरोघरी.. शौचालयाचा वापर करा, झाडे लावा... झाडे वाढवा.. आरोग्य संभाळा, भारत माता की जय, वंदे मातरम..! अशा घोषणा देत देशप्रेम जागृत करत श्रमदानाचे महत्त्व स्वच्छतेचे महत्व पटवून दिले.
या वेळी केंद्रीय मुख्याध्यापक प्रभाकर घाडगे, सहशिक्षक रविंद्र भोसले, विजय चंदनशिवे , रमेश शेंबडे, संभाजी माने, अनिता शिंदे , छाया मसलखांब,, ज्योती कांबळे यांनी परीश्रम घेतले यावेळी सरपंच ज्ञानेश्वर शिखरे शाळा व्यवस्थापन समिती सदस्य महेश मोरे ,सज्जन मोरे, प्रा. दयानंद देवळे, आण्णा खिलारे श्रीकांत पंडित, धनाजी गोवे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

0 Comments