लोकपर्व न्यूज नेटवर्क
जिल्हा सोलापूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आयोजित ग्रंथोत्सव २०२४ कार्यक्रमात गौरव पत्र स्वीकारताना राकेश गायकवाड व डावीकडून क्रमांक दोनवर उपस्थित असलेले राज्य ग्रंथालय आदर्श कार्यकर्ता कुंडलिक मोरे तर गौरव पत्र वितरण करताना मनोरमा परिवाराचे श्रीकांत मोरे.
ग्रंथालय चळवळीत गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत असणारे सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे मार्गदर्शक कुंडलिक मोरे यांचा लातूर जिल्हा ग्रंथालय संघाने कै. अँड. त्र्यंबकदास झंवर राज्यस्तरीय आदर्श ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार देवून नुकतेच सन्मानित केले आ. अभिमान्यू पवार यांच्या हस्ते या पुरस्काराचे नुकतेच वितरण करण्यात आले यावेळी सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे यांच्यासह पुणे विभागीय ग्रंथालय संचालक वंदना देशमुख, राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष गजानन कोटेवार , गुलाबराव पाटील, रामेश्वर पवार, प्रभाकर कापसे ,राम निकले, विनोद गायकवाड, छाया मोरे, वृषाली हजारे ,प्रकाश मोरे, सारिका माडीकर, सारिका मोरे, गीतांजली गंभीरे ,राजश्री माशाळकर उपस्थित होते.
तर उच्च तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई सोलापूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय सोलापूर आयोजित महाराष्ट्र राज्य सांस्कृतीक धोरण २०१० अंतर्गत सोलापूर जिल्हा ग्रंथोत्सव २०२४ या ग्रंथोत्सव निमित्त आयोजित विविध कार्यक्रमात मंगळवेढा कृष्णनगर येथील स्व. संजय- सविता स्मृती वाचनालयाचे संस्थापक श्री राकेश गायकवाड यांना त्यांच्या ग्रंथालय व्यवस्थापनाबद्दल व वाचन संस्कृती टिकून ठेवून ते प्रसारित करत असल्याबद्दल सोलापूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातर्फे या ग्रंथोत्सवा निमित्त गौरव पत्र देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनोरमा परिवाराचे अध्यक्ष श्रीकांत मोरे हे होते त्यांच्याच हस्ते हे गौरव पत्र प्रदान करण्यात आले यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे मसाप चे पद्माकर कुलकर्णी, ग्रंथालय संघाचे जिल्हाध्यक्ष विजय पवार ज्येष्ठ ग्रंथ मित्र विलास शहा, साहेबराव शिंदे, ग्रंथालय निरीक्षक संजय ढेरे प्रमोद पाटील, श्री प्रदिप गाडे , जिल्ह्यातील सर्व ग्रंथालय कार्यकर्ते उपस्थित होते. राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय पुरस्कार व , "गौरव पत्र" प्राप्त झाल्याबद्दल कुंडलिक मोरे व राकेश गायकवाड यांचा ग्रंथालय क्षेत्राबरोबरच विविध सामाजिक , शैक्षणिक स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
0 Comments