LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

श्रीकृष्ण महाविद्यालय व बळीरामदादा बनसोडे शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

दिनांक ०६/०३/२०२५

लोकपर्व न्यूज नेटवर्क:-
पंढरपूर तालुक्यातील चळे येथील श्रीकृष्ण महाविद्यालय व बळीरामदादा शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे झाले.
            कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनाने झाली.

 उत्तरोत्तर कार्यक्रमाची शोभा वाढतच गेली वासुदेव आला हो वासुदेव आला..या गाण्याने महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचा ठेवा उलगडून दाखवला . त्यानंतर शिवजन्मोत्सव पाळणा, उखाणे ,  शिक्षक, शिक्षण, विद्यार्थी, अभ्यासक्रम, परीक्षा, व अंतिम निकाल या विषयावर सादर करण्यात आलेला ड्रामा याने लक्ष वेधून घेतले. 

आणि सर्वोत्कृष्ट कलाविष्कार म्हणून महाविद्यालयातील विद्यार्थी आदित्य पाटील याने सोडा..सोडा...राया नाद खुळा ही लावणी सादर करून कार्यक्रमाची उंची वाढवली.
 अधूनमधून होणारे शिक्षक विद्यार्थी  यांच्यावर पुषपाॅउड हास्याची कारंजी पसरवत होते.
सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन माढा शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तानाजी चंदनशिवे सर, बळीरामदादा बनसोडे शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शशिकांत तांबे सर, संस्थापक अध्यक्ष बळीरामदादा बनसोडे, श्रीकृष्ण महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य नितीन बाबर सर,ज्ञानेश्वर वाघमोडे सर,बालाजी बनसोडे सर,सर्व महाविद्यालयाचे शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक उपस्थित होते.कार्यक्रमाचे मंच संचलन सहा प्राध्यापक पाटील जी.बी मॅडम  व सहा. प्राध्यापक नाईक एस.व्ही. मॅडम यांनी केले. तर आभार प्रदर्शन माळी एस.एस. मॅडम यांनी केले.

           
        

Post a Comment

0 Comments