लोकपर्व न्यूज नेटवर्क:-
पंढरपूर तालुक्याची आठ वर्षातून झालेली आमसभा आठ तासाहून अधिक तास चालली ही आम सभा अनेक विषयांवर वादळी ठरली . या आमसभेसाठी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आ. समाधान आवताडे सांगोल्याचे आ. बाबाराजे देशमुख माढा तालुक्याचे आ. अभिजीत पाटील मोहोळ विधानसभेचे आ. राजू खरे उपस्थित होते हे आमसभा आ. अभिजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली होती.
या आमसभेला विविध विभागाचे क्रमांक दोन चे अधिकारी हजर होते प्रथम क्रमांकाचे अधिकारी गैरहजर राहिले त्यावरूनही वादंग झाला होता. आपु-या माहिती बद्दल अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले होते. परंतु याच झालेल्या आमसभेवरून पंढरपूर तालुक्यातील आजी माजी आमदार समर्थक विविध विषयावरून आमने-सामने "भिडू" लागले आहेत. म्हणजे माजी आमदार प्रशांत प्रचारक समर्थक विरुद्ध आ. अभिजीत पाटील व आ. राजू खरे
हा वादाचा विषय आमसभेवरून ठरल्याचे निमित्त असले तरी यापूर्वी आ. खरे व आ. पाटील यांनी परिचारक विरोधात केलेल्या वक्तव्याचा वास असल्याचे जाणवत आहे. याचीच प्रचिती म्हणून पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषद (बैठकीत) परिचारक समर्थकांनी माढा चे आ. पाटील व मोहोळ चे आ. खरे यांच्या वक्तव्यावर
खदखद बाहेर आली.
पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सभापती हरीश गायकवाड, अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीश मुळे, माजी उपसभापती प्रशांत देशमुख, संतोष घोडके, भगवान चौगुले, तानाजी वाघमोडे, लक्ष्मण पापरकर लक्ष्मण धनवडे, माऊली हळणवर, पंडित भोसले, अनिल अभंगराव, प्राजक्ता बेणारे आदी उपस्थित होते.
-----------
तर याला प्रत्युत्तर म्हणून आ. अभिजीत पाटील समर्थक कार्यकर्त्यांनी आ. पाटील संपर्क कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत माजी आमदार परिचारक समर्थकांनी ठेवलेल्या सर्व आरोपावर उत्तर देण्यात आले. परिचारक समर्थकांचा आमसभा यशस्वी झाली म्हणून पोटशूळ उठला असून आमदार अभिजीत पाटील यांनी पंढरपूर तालुक्याची संबंधित असणाऱ्या इतर चारही आमदारांना एकत्र आणून आमसभा घडवून आणून अनेक विषयावर चर्चा घडवून आणली हे यश परिचारक समर्थकांना बघवत नसल्याचे मत आ. पाटील समर्थक कार्यकर्त्यांनी बोलून दाखवले.
या आमसभेत शहर व ग्रामीण भागातील अनेक प्रश्नावर विस्ताराने चर्चा झाली, महिलांनाही बोलण्याची संधी उपलब्ध झाली त्यामुळे कुठलाही अपप्रचार अथवा वाईट घटना घडली नाही उलट चांगल्या गोष्टीची अंमलबजावणी करण्यासाठी अधिकारी वर्गांना विचारणा करणे यात चुकीचे काय आहे..? असा प्रतिसवाल करण्यात आला.
आ. अभिजीत पाटील यांच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले, संभाजी ब्रिगेडचे किरण घाडगे, राष्ट्रवादीचे संदीप मांडवे, काँग्रेसचे नागेश गंगेकर, अनिता पवार, अमर सूर्यवंशी, प्रशांत शिंदे ,प्रा. तुकाराम मस्के, प्रा. महादेव तळेकर गणेश ननवरे, विशाल आर्वे उपस्थित होते.
0 Comments