दिनांक ०९/०३/२०२५
लोकपर्व न्यूज नेटवर्क:-






पंढरपूर तालुक्यातील चळे जिल्हा परिषद केंद्र शाळेमध्ये ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त महिला पालक व महिला ग्रामस्थ यांच्यासाठी कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धा आयोजित करून सहभागी स्पर्धकांना व उपस्थित महिला प्रतिनिधींना भेटवस्तू व विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्षीस देण्यात आले.
तर पाककृती स्पर्धक विजेत्यांना "पैठणी" बक्षीस देण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्या सौ. दिपाली गायकवाड तर उद्घाटक म्हणून राजमाता जिजाऊ महिला पतसंस्थेच्या चेअरमन सौ. चंद्रभागा घाडगे, प्रमुख पाहुण्या म्हणून माजी मुख्याध्यापिका कल्पना जगताप - भुसे उपस्थित होत्या. या कार्यक्रम प्रसंगी उज्वला वाघ, डॉ. वैशाली गायकवाड, चांदणी पंडित, रूपाली गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले.
महिला दिनानिमित्त एकूण पाच स्पर्धा घेण्यात आल्या त्यापैकी 'तळ्यात मळ्यात' या स्पर्धेत
साक्षी पवार ,गीतांजली साळुंखे, स्नेहल मोरे यांनी अनुक्रमे एक ते तीन क्रमांक पटकावले.
संगीत खुर्ची स्पर्धेत
स्नेहल मोरे, पुनम मोरे, पल्लवी शिंदे, यांनी प्रथम, द्वितीय, तृतीय, यश संपादन केले.
उखाणे स्पर्धेत
सारिका वाघ, सरस्वती कुंभार, प्रियंका सटाले यांनी गुणानुक्रमे यश मिळवले.
रांगोळी स्पर्धेत
भाग्यश्री शिंदे, पूजा मोरे, प्राजक्ता खिलारे,१ ते ३ तर उत्तेजनार्थ- सुप्रिया सटाले, माधुरी मोरे, यांनी यश मिळवले. पाककृती स्पर्धेत
प्रथम उज्वला संतोष वाघ, द्वितीय आनंदी विलास मोरे ,तृतीय डॉ. वैशाली महेश्वर गायकवाड आणि उत्तेजनार्थ- सृष्टी नीतीन मोरे , वनिता भास्कर वाघ यांनी यश संपादन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्र. मुख्याध्यापक सतीश बुवा, उषा खांडेकर , रेखा जाधव प्रशांत ठाकरे, विकास बढे, आण्णासाहेब रायजादे. कु ऋतुजा वाघमारे, कु. विश्रांती कांबळे यांनी परिश्रम घेतले. प्रारंभी राजमाता जिजाऊ, सावित्रीमाई फुले, रमामाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिला पालक ग्रामस्थ उपस्थित होत्या.
0 Comments