LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

सोलापूर व पंढरपूर बाजार समितींत सत्ताधारी- विरोधकांचा कलगीतुरा तापला; आरोप- प्रत्यारोपांचा बाजार मात्र जोरात रंगला ..! (रंग राजकारण विशेष )

दिनांक  २२/०३/२०२५
रंग राजकारण विशेष 

लोकपर्व न्यूज नेटवर्क 

सोलापूर जिल्ह्यात उष्णतेचा पारा सर्वात जास्त असल्याचा बोलबला आहे त्यातच सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीचा पारा कडक 
उन्हा बरोबरच विविध विषयांवरील अंगाने वाढत असल्याचे चित्र समोर येत आहे . त्याची सुरुवात 'प्रशासक" पदाच्या नियुक्तीवरून सुरुवात झाली . भाजपचे आ. सचिन कल्याणशेट्टी अवघ्या बारा दिवसात रद्द करण्यात आलेले बाजार समितीचे प्रशासक पद पुन्हा फेर नियुक्तीच्या आदेशाने पणन उपसंचालक मोहन निंबाळकर नियुक्त झालेले प्रशासकपद २० मार्च रोजी निवड निवडीचे पत्र हातात पडते ना पडते तोपर्यंतच त्याच दिवशी नियुक्तीला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ.  बसवराज बगले यांनी नियुक्तीला उच्च न्यायालयात आव्हान देत नियुक्ती रद्द बदल ठरवली ‌. आणि सोलापूर बाजार समितीच्या प्रशासक पदाचा कार्यभार पुन्हा एकदा सोलापूर शहर उपनिबंधक डॉ. प्रगती बागल यांच्याकडे कायम ठेवण्याचा आदेश ही न्यायालयाने दिला. प्रशासक हा निष्कलंक व राजकीय हस्तक्षेपा पासून मुक्त असावा असा निर्देश देत पुण्यातील पणन संचालकांनी प्रशासक पदी योग्य व्यक्तीची नियुक्ती करण्याचे निर्देश ही न्यायालयाने दिले आहेत प्रशासकाची भूमिका संचालक मंडळाच्या निवडणुका निपक्ष आणि वेळेत पार पडतील याची खात्री करावी प्रशासकाने धोरणात्मक अधिकार वापर करू नये असेही निर्देश दिले आहेत. एकूणच निवडणुकीपूर्वी वातावरण तापत असल्याचे चित्र समोर येत आहे बाजार समितीच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी काही दिवसातच उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत संचालक मंडळाच्या निवडणुकीतील राजकीय वातावरण "गरम" होतानाच प्रशासक नियुक्ती वरून न्यायालयातील लढाईत चुरस दिसली आहे यंदाची निवडणूक जास्त तापणार हे स्पष्ट झाले आहे या निवडणुकीत कोणता नेता कोणाबरोबर राहणार हे काही दिवसात कळणार आहे. मात्र तपमान वाढवणाऱ्या अनेक अंतर्गत राजकीय घडामोडी मात्र मोठ्या स्वरूपात घडत आहेत.

                त्यातच पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बेदाणा सौदे बाजारावरून सभापती हरीश गायकवाड व आ. अभिजीत पाटील यांचाही कलगीतुरा जास्तच तापलेल्या रंगाने पुढे आला आहे. आ. अभिजीत पाटील यांनी विधानसभेत बेदाण्याला६५१ असा  विक्रमी दर मिळत असताना  बेदाणा सौदे बाजार बंद असल्याबद्दल व सहा अडत्यांना माल खरेदी करण्यास मज्जाव केल्याने सुमारे  ३०० शेतकऱ्याचा माल पडून राहिला असा आरोप ठेवत विषय विधानसभेत उपस्थित केला होता .  पंढरपूर बाजार समितीवर भाजपचे माजी आ. प्रशांत परिचारक यांच्या गटाची सत्ता आहे.
        या विधानसभेत उपस्थित केलेल्या राष्ट्रवादी  चा आ. अभिजीत  पाटील प्रश्नाला व आरोपाला उत्तर देताना सभापती हरीश गायकवाड यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत  आ. पाटील यांचे  आरोप व विषय खोडून काढले आहेत सभापती गायकवाड म्हणाले याच महिन्यात जवळपास १३१ कोटी बेदाण्याची खरेदी झाली असून विक्रमी ६५१ रुपये दर मिळाला आहे आ. अभिजीत पाटील यांनी माल खरेदी न केलेल्या अशा ३०० शेतकऱ्यांची यादी जाहीर करावी असेही आव्हान दिले आहे. आणि सहा अडत्यांना काही वेळे पुरता काही दिवसासाठी खरेदी बंद  ठेवण्याचे आदेश दिले होते . याचा अर्थ कायमस्वरूपी बंद असा होत नाही वेळेचे अचूक नियोजन करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता असे सांगत पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती करकंब भंडीशेगाव  व पुळुज या ठिकाणी उप बाजार समिती सुरू करण्याचा विचार करत असल्याचे सांगितले. एकूणच सोलापूर व पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सत्ताधारी व विरोधकांचा  कलगीतुरा तापला आहे; आरोप- प्रत्यारोपांचा व राजकीय कुर-घोडी डावपेचाचा बाजार मात्र जोरात रंगला याचेच प्रचिती सर्वांना जाणवू लागली   आहे. बेदाणा सौदे बाजाराच्या निमित्ताने बाजार समितीच्या निवडणुकीतील सत्ताधारी व विरोधक आमने-सामने आल्याची चर्चा मात्र जोरात रंगत आहे.

 राजरंग 

अतुल मोरे, ९८३४७५१९२०

Post a Comment

0 Comments