अजित पवार गटाकडून संजय खोडके ,
तर भाजपकडून संजय किणीकर, संदिप जोशी, दादासाहेब केचे,
शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून रघुनाथ सुर्यवंशी
या उमेदवारांची जवळपास नावे निश्चित झाली आहेत. आता ऐनवेळी बदल होण्याची शक्यता कमी आहे.
महाराष्ट्रा सह विधान परिषदेसाठी शिवसेना-भाजप राष्ट्रवादी या महायुतीकडून अनेकजण इच्छुक होते परंतु सोलापूर जिल्ह्यातून सर्वाधिक इच्छुक संख्या अधिक होती त्यात भाजपकडून माजी विधानपरिषद आमदार प्रशांत परिचारक, माजी आमदार राजेंद्र राऊत ,
माजी आमदार राम सातपुते यांची नावे समर्थकांकडून आघाडी वर होती तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून राजन पाटील, उमेश पाटील शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून माजी आमदार शहाजी बापू पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवसेना नेते प्रा. शिवाजी सावंत या सर्वांची सोलापूर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवार म्हणून नावे चर्चेत होते परंतु महायुतीतील सर्वच पक्षाकडून इतर नावाची अधिकृत घोषणा झालेली असल्याने यांना थांबावं लागणार आहे यांची नाराजी कशाप्रकारे पक्ष घालवणार हा आता औत्सुक्याचाविषय बनणार आहे.
0 Comments