LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

चळे परीक्षा केंद्रावर १२ वी च्या ४१०; तर १० वी च्या ३७८ विद्यार्थ्यांनी सुयोग्य वातावरणात दिली परीक्षा; निकाल १५ में पूर्वी लागण्याची शक्यता..?

दिनांक १९/०३/२०२५

लोकपर्व न्यूज नेटवर्क 

संग्रहित छायाचित्र 

पंढरपूर तालुक्यातील चळे येथील श्री दर्लिंग विद्या मंदिर व भास्कर आप्पा गायकवाड कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता दहावी व बारावीचे परीक्षा केंद्र होते या परीक्षा केंद्रावर बारावीच्या ४१० विद्यार्थ्यांनी तर दहावीच्या ३७८ विद्यार्थ्यांनी सुयोग्य व सुरळीत वातावरणात परीक्षा दिली कोणताच अनुचित प्रकार घडला नाही बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये चळे, आंबे रांझणी, सरकोली, येथील कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी होते तर दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये आंबे, सरकोली, ओझेवाडी, नेपतगव, रांझणी सिद्धेवाडी, चळे येथील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी सहभागी होते. अशी माहिती दहावी परीक्षा केंद्र प्रमुख आर टी गायकवाड तर बारावी परीक्षा केंद्रप्रमुख प्रमोद गायकवाड यांनी दिली. परीक्षा संपल्यानंतर परीक्षार्थी विद्यार्थी आपल्या घरापर्यंत व्यवस्थित कसा पोहोचेल याची स्थानिक परीक्षा विभाग नियंत्रक मंडळाने व्यवस्थित काळजी घेतली. अशी माहिती प्राचार्य जे. बी. गायकवाड यांनी दिली 
        आता विद्यार्थ्यांचे व पालकांचे लक्ष निकालाच्या तारखेकडे लागले असून बारावी व दहावीच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम ४० ते ५० टक्के झाल्याचा अंदाज वर्तवला जात असून परीक्षा गतवर्षीपेक्षा दहा दिवस अगोदर सुरू झाल्या होत्या. बारावीच्या ११ फेब्रुवारी तर दहावीच्या २१ फेब्रुवारी रोजी परीक्षेला सुरुवात झाली होती १७ मार्च रोजी परीक्षेचा शेवटचा पेपर झाला.  दहावी व बारावीचा निकाल १५ मे पूर्वी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे . त्या तारखेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निकालानंतर अनेक विद्यार्थ्यांच्या अनेक वाटा निश्चित होणार आहेत.

Post a Comment

0 Comments