तुकाराम बीज म्हणजे 'जो' दिवस की तुकाराम महाराज आजच्या दिवासापासून पुन्हा पुढे कधीच दिसणार नाहीत असे जाहीर केलेला 'तो' दिवस होय. त्या दिवसापासून तुकाराम बीजे ला विविध आध्यात्मिक कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात तीर्थ क्षेत्राच्या ठिकाणी व गावोगावी च्या मंदिरात भरगच्च आध्यात्मिक कार्यक्रम केले जातात.
देहू नगरी तर आध्यात्मिकच्या चैतन्यमय वातावरण रमलेली असते . विविध पालख्या, दिंड्या, संपूर्ण महाराष्ट्रातील भक्तगण देहूकडे मार्गक्रमण करत असतात.
टाळकरी -वारकरी , प्रवचन - कीर्तनकार भक्ती रसात चिंब झालेले असतात.
त्यातच यावर्षीचा जगद्गुरु संत तुकाराम महाराज पुरस्कार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर झाल्याने एक वेगळेच वलय प्राप्त झाले आहे. नुकताच देहू संस्थांनने १६ मार्च रोजी सकाळी नामदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुरस्कार देऊन गौरवले
त्यातच दुसरे महत्त्वाचे आकर्षण म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या सुमारे दोन महिने कालावधी पासून बनवलेली विश्वविक्रमी पगडी
संबंध महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील तुकाराम बीज निमित्त विविध धार्मिक अध्यात्मिक कार्यक्रम घेतले गेले.
पंढरपूर तालुक्यातील चळे येथील हनुमान मंदिरात भजन कीर्तन दंग असलेले भक्तगण
असे अनेक आध्यात्मिक कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात तुकाराम बीज निमित्त संपन्न झाले.
0 Comments