LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

चळे येथील "वटवृक्षाची व तळ्याची" जोपासना करुन सौंदर्यीकरण वाढवण्याची ग्रामस्थांची मागणी ; झाडे लावा ..झाडे वाढवा...झाडे वाचवा... अभियान सिध्द करा..!

दिनांक १२/०३/२०२५

लोकपर्व न्यूज नेटवर्क:
पंढरपूर तालुक्यातील चळे येथील गावच्या मुख्य प्रवेश द्वारावर बसस्थानकाजवळ असलेल्या अतिशय जुने वटवृक्ष वडाचे झाड व तळे आहे हे दोन्हीही ज्ञात असलेल्या तीन पिढ्यापासून किंवा (३०० वर्षांहून ) त्यापेक्षाही अधिक कालावधीपासून अस्तित्वात असल्याचे सांगितले जात आहे आणि ही वस्तुस्थिती पण आहे . 

सन २०१८ - १९ या वर्षापर्यंत असलेली झाडाची स्थिती

 सध्या या वडाच्या झाडाच्या दोन फांद्या अर्धवट तुटलेल्या अवस्थेत आहेत तर अनेक फांद्या वाळलेल्या अवस्थेत पहावयास मिळत आहे.  आणि हे झाड कोरोना कालावधीनंतर (सन २०१८-१९) अनेक पक्षांचे आश्रय स्थान बनले असल्याने अनेक पक्षी या झाडावर वास्तव्यास आहेत . या पक्षांच्या आश्रस्थानामुळेच झाडालाही धोका निर्माण झाला आहे कारण या पक्षांची सर्व विष्टा प्रत्येक पानावर झाडाच्या सालीवर व पारंब्यावर पडत असल्याने झाडाला सूर्यप्रकाश ग्रहण करता येत नाही त्यामुळे  झाडाची स्व-अन्नप्रक्रिया (प्रकाश संश्लेषण) निर्मिती थांबली  त्यामुळेच झाडाची वाढ खुंटण्याबरोबरच  फांद्या वाळलेल्या आहेत. त्यामुळे झाडाचे दुरावस्था झाली आहे. आणि पक्षाची विष्टा खाली पार कट्ट्यावर जमिनीवर पडत असल्याने दुर्गंधी अधिकच वाढली आहे. त्यामुळेच हे झाड तोडावे का..? असा प्रश्नचिन्ह स्थानिक प्रशासनासमोर पडला आहे. तर नागरीक द्विधा मनस्थितीत आहेत.

   सध्याची असलेले वडाच्या झाडाच्या अवस्था सन २०२५
      परंतु चळेतील कांहीं ग्रामस्थ व पर्यावरण प्रेमी नागरिकांतून हे वडाचे झाड पूर्णपणे तोडण्यास विरोध व्यक्त होत आहे अनेक ग्रामस्थांनी हे झाड पूर्णपणे न तोडता फक्त तुटलेल्या फांद्या आणि वाळलेल्या फांद्या तोडण्यात याव्यात. त्याचबरोबर झाडाच्या ज्या पारंब्या झाडाच्या खोडा पर्यंत आलेल्या आहेत, त्या पारंब्यांना  पार कट्ट्यावर पृष्ठभागावरील सिमेंटचा वाळू मिश्रित कोब्याचा थर तोडून  कट्ट्याची उंची वाढवून त्यात माती भरल्यास आणि खोडाकडे झेपावणाऱ्या  पारंब्या त्या मातीत मिसळल्यास  वडाच्या झाडाला नवसंजीवनी प्राप्त होईल. असे मत व्यक्त होत आहे.
     त्याचबरोबर पुन्हा जोमाने हे झाड वाढू शकते आणि वाळलेल्या व तुटलेल्या फांद्या तोडून वडाच्या झाडाची स्वच्छता केल्यास झाडाची सूर्यप्रकाश शोषून घेण्याची क्षमता वाढेल व स्व अन्न निर्मिती प्रक्रिया (म्हणजेच प्रकाश संश्लेषण) चालू होईल त्यामुळे झाड अधिक खुलेल पालवी फुटेल . झाड स्वच्छ झाल्यामुळे पक्षांना आश्रय स्थान वाटणार नाही पक्षीही कमी प्रमाणात बसतील तात्पुरते बसतील. पुन्हा दुसऱ्या झाडावर उडून जातील त्यामुळे पक्षांचा त्रास आपोआप कमी होईल असा अंदाज लावला जात आहे

वडाच्या झाडा शेजारी सुधारणा करण्यासाठी प्रतिक्षेत असलेले तळे
             सध्या  याच वडाच्या झाडाच्या शेजारी असलेल्या व अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले गेलेले तळे वाचवायचे असेल तर त्याचीही स्वच्छता व सौंदर्य वाढवायचे असेल तर संपूर्ण तळ्याच्या गोलाकार बाजूने स्वच्छतेसाठी जास्त उंचीचे तारेचे कुंपण करणे आवश्यक आहे या तळ्याच्या सर्व बाजूंनी फुलझाडे व सावली देणारी झाडे लावल्यास तळ्याच्या मध्यभागी अधिक उंचीचा चौथरा निर्माण करून त्या चौथऱ्यावर ज्याच्याकडून प्रेरणा मिळेल अशी कलाकृती बसवल्यास  व या कलाकृतीकडे मार्गक्रमण करण्यासाठी चारी दिशांनी मार्ग निर्माण केल्यास आणि तळ्यात पाण्याच्या कारंजाची रोमहर्षक निर्मिती केल्यास अधिक सौंदर्य वाढेल. गाव पातळीवरचं एक आकर्षक पर्यटन स्थळ सुद्धा तयार होई आणि वडाच्या झाडावरील पक्षी सुद्धा इतर झाडावर विखुरले जातील. पक्षापासून होणारे वडाच्या झाडाचे  विद्रूपीकरण ही थांबेल असा आशावाद व्यक्त होत आहे.

" तळ्यात टाकला जाणारा कचरा थांबला  तरच तळ्याची स्वच्छता वाढेल.  तळ्यातील पाणीही स्वच्छ राहण्यास मदत होईल. एकूणच वटवृक्षाची व तळ्याची योग्य पद्धतीने जोपासना करून सौंदर्य वाढवून झाडे लावा.... झाडे वाढवा झाडे वाचवा.. हे अभियान सिद्ध करण्याची मागणी चळे
 ग्रामस्थांतून होत आहे ".  

Post a Comment

0 Comments