लोकपर्व न्यूज नेटवर्क:-
अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला , मुंबई आयोजित शामची आई संस्कार परीक्षेचा पारितोषिक व प्रमाणपत्र वितरण सोहळा आढीव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत उत्साहात संपन्न झाला .
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास मुख्याध्यापक मारूती शिरगूर , उपशिक्षिका लता पिंपरकर, राजश्री शेलार, गीतांजली गोडाळे आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी शामची आई संस्कार परीक्षेत चांगले गुण मिळविणाऱ्या ११ विद्यार्थांना प्रमाणपत्र व शैक्षणिक साहित्य स्वरूपात पारितोषिके देण्यात आली. ही परीक्षा साने गुरुजी लिखित शामची आई या पुस्तकावर आधारित घेतली जाते. याच कार्यक्रमात महिला दिनाच्या निमित्ताने आढीव गावातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस , आशा सेविका यांचा सन्मान करण्यात आला. उपस्थितांचे स्वागत शशिकांत घाडगे यांनी केले. सूत्रसंचालन विश्वनाथ धावणे यांनी केले तर राजाराम कटकदौंड यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सुनिल बंडगर, अतुल भोसले यांनी परिश्रम घेतले.
0 Comments