LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे प्राथमिक शाळांची वेळ कमी करण्यात यावी ;७.३०ते ११.३० सुधारीत वेळेचा आदेश काढावा विद्यार्थी, पालक वर्गाची मागणी

दिनांक १०/०३/२०२५
लोकपर्व न्यूज नेटवर्क 

सध्या उन्हाची तीव्रता अधिक वाढत असल्याने सोमवार दहा मार्चपासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या वेळा सकाळी साडेसात ते साडेबारा करण्याचा निर्णय सोलापूर जिल्हा प्रशासनाने व शिक्षण  विभागाने घेतला आहे परंतु ही वेळ  अतिशय गैरसोय व त्रासदायक ठरत  आहे प्रसंगी जीवावर बेतण्याची शक्यता वाढली आहे. 
    उन्हाची तीव्रता अधिक जास्त असल्याने विद्यार्थ्यांना उन्हाचे अधिकचे चटके सहन करावे लागत आहेत. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी तीन ते चार किलोमीटर अंतरावरून जिल्हा परिषद शाळेचा प्रवास करत आहेत . साडेबारा वाजता शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घराकडे परतीचा प्रवास संकटकालीन मार्ग बनण्याची शक्यता व भीती पालक वर्गातून व्यक्त होत आहे  कारण सकाळी दहा वाजल्यापासूनच उन्हाची तीव्रता अधिक वाढत आहे. सूर्याच्या दाहकते ते बरोबरच जमिनीची उष्णता ही अधिक प्रमाणात वाढत आहे त्यामुळे सर्वांनाच दोन्ही बाजूंनी उन्हाच्या झळया सहन कराव्या लागत आहेत.             त्यातच अनेक विद्यार्थी अनवाणीच पायी प्रवास करत आहेत.म्हणजे लांबचा प्रवास करणारा विद्यार्थी असेल अथवा गावातील असो शहरी भागातील असो घरापर्यंत जाताना उन्हाच्या तडाख्याने अक्षरशः तो भाजून निघत आहे .त्यामुळे सोलापूर जिल्हा प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन शाळेची वेळ (७.३० ते १२.३०) ऐवजी एक तासाने कमी करून तो कालावधी सकाळी ७.३०ते ११.३० असा  करावा  किंवा या कालावधीत भरावी . अशी मागणी विद्यार्थी, पालक, शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षक वर्गातूनही होत आहे.
 सध्या काही पालक आपल्या पाल्यांना वाढत्या उन्हापासून बचाव करण्यासाठी ११.३० वाजता शाळेत येऊन घेऊन जात आहेत असे अनेक ग्रामीण भागातून व शहरी भागातून चित्र समोर येत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्वरित निर्णय घेऊन शाळेचे वेळ साडेसात ते साडेअकरा निश्चित करावी अशी मागणी जोर धरत आहे.


   "सोलापूर जिल्हा शिक्षण विभागाला जर तास कमी झाल्यासारखे वाटत असतील तर यापूर्वीच्या (शनिवारच्या) नऊ ते साडेबारा या वेळेत फक्त साडेतीन तासच भरतात आणि आता पालक, विद्यार्थी यांच्या मागणीनुसार ७.३० ते ११.३० अशी वेळ ठेवली तर सर्वांनाच उपयुक्त ठरेल . कामाचे रोजचे चार तास भरतात त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षण विभाग सोलापूर यांनी सोलापूर  जिल्ह्यातील प्राथमिक शाळांची वेळ साडेसात ते साडेअकरा ठेवली जावी अशी मागणी आमची आहे."
         अतुल मोरे, 
   सदस्य शाळा व्यवस्थापन समिती 
 जिल्हा परिषद शाळा केंद्र शाळा चळे ता. पंढरपूर 

    


 

Post a Comment

0 Comments