दिनांक - २३/०२/२०२५
लोकपर्व न्यूज नेटवर्क
मुंबई : भारतीय चिकित्सा पद्धति राष्ट्रीय आयोग, आयुष मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने आयोजित 'देश का प्रकृति परीक्षण' अभियान यशस्वीपणे संपन्न झाले असून, या अभियानाच्या प्रथम टप्प्याच्या समारोप व धन्वंतरी पुरस्कार वितरण सोहळ्यात डॉ. दीपक पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज & रिसर्च सेंटर, पन्हाळा (AYU0586) यांना राष्ट्रीय स्तरावरील गौरव प्रदान करण्यात आला.
"देश का प्रकृति परीक्षण' अभियानात राष्ट्रीय स्तरावर प्रथम पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते स्वीकारताना कॉलेजच्या वतीने अभियान प्रतिनिधी सदस्य म्हणून (चळे ता. पंढरपूर येथील) डॉ. सुहास हरी मोरे यांनी उपस्थिती दर्शवून हा पुरस्कार स्वीकारला.,,
हा भव्य पुरस्कार वितरण समारंभ 20 फेब्रुवारी 2025 रोजी जमशेद भाभा थिएटर (JBT), नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (NCPA), नरिमन पॉइंट, मुंबई येथे पार पडला. या सोहळ्यास मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते, कार्यक्रमाध्यक्ष मा. उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) व आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मा. श्री. प्रतापराव जाधव, महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री मा. श्री. हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मा. श्री. प्रकाश अबिटकर, तसेच आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा, भारतीय चिकित्सा पद्धति राष्ट्रीय आयोगाचे सभापती वैद्य जयंत देवपुजारी, आणि 'देश का प्रकृति परीक्षण' अभियानाचे सचिव डॉ. आशुतोष गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
राष्ट्रीय स्तरावरील सन्मानाने आत्मविश्वास उंचावला
या अभियानात डॉ. दिपक पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज & रिसर्च सेंटर, पन्हाळा, महाराष्ट्र यांनी स्नातक महाविद्यालये (UG) गटामध्ये *'स्ट्राईक रेट'* नुसार देशामध्ये प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान पटकावला. संस्थेच्या उत्कृष्ट सहभागामुळे 'देश का प्रकृति परीक्षण' अभियानाला अधिक बळकटी मिळाली. त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल भारतीय चिकित्सा पद्धति राष्ट्रीय आयोगाने विशेष प्रशस्ति पत्र देऊन सन्मानित केले त्यामुळे सर्वांचाच अभिमान उंचावला आहे अशा प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
संस्थेचे योगदान आणि अभिमानास्पद कामगिरी-
या अभियानाद्वारे प्राकृतिक उपचार पद्धतींचा प्रचार आणि जनजागृती करण्यात आली. डॉ. दिपक पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजने संस्थेच्या विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांच्या सक्रिय सहभागातून देशभरात सर्वोत्तम योगदान दिले. संस्थेच्या यशस्वी कार्यामुळे महाराष्ट्रातील आयुर्वेद शिक्षण क्षेत्रासाठी ही मोठी गौरवाची बाब ठरली आहे.
प्रशस्ति पत्र आणि गौरव चिन्ह देऊन सन्मान सन्मान-
"याप्रसंगी, भारतीय चिकित्सा पद्धति राष्ट्रीय आयोगाचे सभापती वैद्य जयंत देवपुजारी आणि केंद्रीय आयुष राज्यमंत्री मा. श्री. प्रतापराव जाधव यांच्या हस्ते महाविद्यालयाला प्रशस्ति पत्र आणि गौरवचिन्ह प्रदान करण्यात आले,,
या यशात अनेकांचा सिंहांचा वाटा
या सन्मानामुळे डॉ. दिपक पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज & रिसर्च सेंटर, पन्हाळा हे राष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त होत आहे. महाविद्यालयाने केलेल्या अथक परिश्रमांमुळे संपूर्ण आयुर्वेदिक शिक्षण क्षेत्राला प्रेरणा मिळेल.
या अभियानामध्ये संजीवनी मल्टीपर्पज फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष मा डॉ दिपक पाटील सर, सचिव मा डॉ सौ स्वाती पाटील मॅडम, व्यवस्थापकीय संचालिका मा डॉ सौ स्मिता पाटील मॅडम, प्राचार्य मा डॉ नितीन ताटपुजे सर यांच्या सहमहाविद्यालयातील सर्व अध्यापक, अध्यापक, अध्यापकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी, आणि हॉस्पिटल कर्मचारी यांचे बहुमोल योगदान लाभले
0 Comments