दिनांक - २२/०२/२०२५
लोकपर्व न्यूज नेटवर्क
पंढरपूर तालुक्यातील चळे येथे सुमारे ३१३ वर्षांपूर्वीची एक घुमठाकार आकाराची इमारत असून त्या इमारतीवर शिलालेख आढळला आहे हा शिलालेख व इमारत त्यावेळच्या गावच्या (प्रमुखाची, मोकदम, पाटील, सरदार ) यांची असल्याचा खुलासा प्रसिद्ध शिलालेख अभ्यासक कृष्णा गुडदे ( लातूर) यांनी केला असून अशा पुरातन इमारतीचे व शिलालेखांचे पुरतत्व खाते व ग्रामस्थ व गाव पातळीवरील शासनव्यवस्था यांच्या सानिध्याने जतन व संवर्धन होणे गरज असल्याचे मत व्यक्त केले.
हा शिलालेख पाच ओळींचा असून शिलालेखाचा प्रारंभ गणेश वंदनाने केली असून हा शिलालेख व बांधकाम संवसर १६३४ व इसवी सन १७१२ या कालावधीतला असून सुमारे ३१३ वर्ष झाली असल्याचा अंदाज व्यक्त केला. त्यावेळी निजामशाही ,शिवशाही, आदिलशाही या परिसरातील कोणती राजवट असेल त्या राजवटीतील हा शिलालेख असल्याचा अंदाज व्यक्त केला. हा शिलालेख व घुमटातील स्वागतपर अवस्थेतील मूर्ती ही त्या वेळेस मोकादम (प्रमुख , सरदार , पाटील) असणाऱ्या बहिर्जी षरात (खरात) (बहीजामा षात्राम) यांची असू शकते.
कारण त्यावेळेस गावच्या प्रमुखांच्या स्मरणार्थ घुमट बांधण्याची पद्धत होती त्यानुसार त्यांच्या वारसांनी अथवा राजव्यवस्थेने बांधले असावे असे मत अभ्यासक गुडदे यांनी व्यक्त केले. शिलालेख अभ्यासक यांना निमंत्रित करण्याचे काम श्री दर्लिंग विद्या मंदिर येथील सहशिक्षक दत्तात्रय सरीक यांनी मोलाची भूमिका बजावली.
या चौकोनी आकाराच्या व शिखरावर गोल घुमटाकर पद्धतीच्या कळस असणाऱ्या वास्तुत महादेवाची पिंड, आयताकृती आकाराचा दगड, आतील बाजूने फुलांच्या आकाराचे कोरीव काम आढळून आले.
"त्याचबरोबर प्रवेशद्वारावर एका बाजूला "चंद्राचीकोर" आणि दुसऱ्या बाजूला "पूर्णचंद्र" याचे कोरीव काम दर्शवते याचा अर्ध चंद्र जसा वाढत जाऊन पूर्ण चंद्र होतो म्हणजे 'चल' चाल (CHAL) म्हणजे हळूहळू वाढ होवून पूर्णत्वाकडे. चल वरूनच चळे इंग्रजीत चले, चाले (CHALE ) हे नाव असावे". असा अंदाज बांधला जावू शकतो.
0 Comments