मला मतदान करणारे ही माझेच व न करणारे ही माझेच आहेत त्यामुळे मी त्यांचे आभार मानत आहे एक टांगेवाल्याचा मुलगा आमदार होऊ शकतो हे लोकशाहीनं सिद्ध केलं आहे असे सांगून मोहोळ विधानसभा मतदारसंघातील सर्वच गावांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही यापूर्वीच्या विकास कामापेक्षाही अधिक पटीने मी विकास कामे करून दाखवीन अशी ग्वाही आमदार राजू खरे यांनी दिली. ते चळे ता. पंढरपूर येथील महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने ग्रंथ व व्यासपीठ, वीणा पूजन शुभहस्ते प्रारंभ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विठ्ठल च माजी संचालक
ज्ञानेश्वर गायकवाड हे होते. कार्यक्रमास विठ्ठल चे माजी संचालक विठ्ठल मोरे, संतोष गायकवाड विद्यमान संचालक उमेश मोरे, केबीपी महाविद्यालयाचे उपप्राचार्य सुदाम गायकवाड, श्री दर्लिंग विद्या मदिर व भास्करआप्पा गायकवाड कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य जे.बी. गायकवाड माजी उपसरपंच भास्कराव मोरे, गोपीनाथ गायकवाड, रमेश मोरे, विजय वाघमारे, श्रीकांत पंडीत लखन वाघमारे , बालाजी बनसोडे , नामदेव मोरे उपस्थित होते. आ. राजू खरे यांचा मोहन मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रस्ताविक ह.भ.प. रमेश मोरे यांनी केले.
आभार राहुल गायकवाड यांनी मानले. या कार्यक्रमास गावातील , श्रीराम, पांडुरंग, हनुमान, महादेव भजनी मंडळातील कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी उमेश सिदवाडकर ( आंबे )यांचा उदगीर येथे झालेल्या भजन गायन स्पर्धेत उत्कृष्ट गायक म्हणून पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल आमदार खरे यांच्या हस्ते सिदवाडकर यांचा सत्कार करण्यात आला.
0 Comments