LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

निवडणूकीच्या हातघाईवर आरक्षणाचा मुद्दा भरडतोय .! कोण सुपात अन् कोण जात्यात जाणार..?

रविवार की राजकीय बात
 दि. १५/०९/२४
लोकपर्व न्यूज नेटवर्क :-
 महाराष्ट्रात आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे त्यात आधीकची भर पडली लोकसभेचे विरोधी पक्षनेते काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या वक्तव्याने. त्यावरून आरोप - प्रत्यारोप सावरा- सारव होत आहे. चालू आहे.
                 मराठा आरक्षण आंदोलनांचे प्रणेते मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वी २९ सप्टेंबर ची मुदत दिली होती त्यानंतर राजकीय निर्णय व भूमिका जाहीर करणार होते परंतु तत्पूर्वी  त्यानी १६  सप्टेंबर पासून उपोषणाचा मार्ग पुन्हा अवलंबणार असल्याचे जाहीर केले आहे. मराठा आरक्षणासंदर्भात अनेक नेत्यांनी आपला पाठिंबा जाहीर करत विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार म्हणून नावेही दिली आहेत राज्यातून सुमारे ९०० अर्ज प्राप्त झाल्याची माहिती जरांगे पाटील यांनीच दिली आहे.  कोर्टात  असणाऱ्या याचिकेवर सुनावणी कडून ही अपेक्षा उंचावल्या आहेत.
                  त्यातच धनगर आरक्षणाचा  मुद्दा ही पुन्हा समोर आला आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमाती मधून एसटी मधून आरक्षण द्यावे या मागणीसाठी पंढरपूर येथील टिळक स्मारक मैदान येथे सकल धनगर समाजाचे आमरण उपोषण सुरू आहे त्यातील चौथ्या दिवशी उपोषण करते दीपक बोराडे यांचे प्रकृती खालावली असल्याचे वृत्त जाहीर झाले आहे त्यांचीही मागील ७८ वर्षापासून फसवणूक होत असल्याचा आरोप  राजकर्त्यावर करत आहेत.  सरकारने एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणी धनगर समाजाच्या वतीने करण्यात येत आहे. 
       तर गेल्या आठवड्यापासून बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत व मराठा आंदोलन मनोज जरागे पाटील यांच्यात
 चांगलेच दावे, प्रति दावे, वार प्रति वार होत आहे, त्यातच आमदार राजेंद्र राऊत यांनी १२ सप्टेंबर पासून बार्शी येथे ठिय्या आंदोलन चालू केले असून त्यांनीही मराठा समाजास ओबीसी मधून आरक्षण मिळावे अशी मागणी करतानाच सर्वच राजकीय पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करावी त्यासाठी सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे जास्तीत जास्त सर्वपक्षीय आमदाराने विशेष अधिवेशनाची मागणी विधानसभा अध्यक्ष कडे  करावी त्यासाठी मनोज जरागे पाटील यांनीही प्रयत्न करावेत  अशी मागणी करतानाच जर सर्वच राजकीय पक्षाने मराठा समाजास ओबीसी मधून आरक्षण देण्यास विरोध केल्यास राज्यातील पाच कोटी मराठ्यांनी विधानसभेच्या निवडणुकीत बहिष्कार घालावा असे आवाहन ही केले आहे.     त्या अगोदर त्यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात १९९४ पासून व त्या अगोदरच्या कालावधीपासून खासदार शरद पवार व महाविकास आघाडी यांना जबाबदार धरले आहे. यामुळे आरक्षणाच्या प्रश्नासदर्भात महायुती व महाविकास आघाडी यातील  सर्वच राजकीय पक्षांना जात्यातून सुपात... सुपातून जात्यात  जावे लागत आहे हे निश्चित झाले आहे.
       आणखीन महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पंढरपूर येथे सुरू असलेल्या धनगर समाजाच्या आंदोलनास माजी.खा. राजू  शेट्टी भेट देण्यासाठी आले असता त्यानी आमची तिसरी नव्हे तर पहिली आघाडी स्थापन होणार असल्याचा खुलासा केला आहे त्यामध्ये माजी आमदार वामनराव चटप यांची शेतकरी संघटना  माजी आमदार शंकराव धोंगडे यांची महाराष्ट्र विकास समिती,  स्वाभिमानी शेतकरी संघटना  आमदार बच्चू कडू यांची प्रहार, छत्रपती संभाजीराजे यांच्याशी विचार विनिमय चालू असल्याचे जाहीर करून १९ सप्टेंबरला पुण्यामध्ये बैठक होणार असल्याचे सांगितले.
      ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागून नोव्हेंबर मध्ये निवडणुका घेण्याचे सुनिश्चित होत असल्याचा अंदाज बांधला जात असून निवडणुकीत कोणता पक्ष जात्यात व कोणता पक्ष सुपात असणार हे निवडणुकीच्या निकालानतर स्पष्ट होणार आहे 
सर्वांनाच आरक्षणाच्या अनिश्चितेचा   धोका सध्या भरडून काढत आहे. राजकीय पक्षांचे जात्यातील सुपात ... सुपातील जात्यात...! हे कालचक्र केव्हा थांबणार असा प्रश्न मात्र सर्व सामान्य लोकांना भेडसावत आहे.

 

अतुल मोरे, ९८३४७५१९२०


 


            
 

Post a Comment

0 Comments