LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

भविष्यातील स्पर्धेनुसार गुणवत्ता वाढीसाठी अधिकचे प्रयत्न करावेत:- काळे

दि. १७/०९/२४

लोकपर्व न्यूज नेटवर्क:-
गाव वाडी वस्तीवरील शाळांतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षक अथक प्रयत्न करत असल्याबाबत समाधान आहे तसेच शाळेच्या प्रगतीचा प्रसार व प्रचार सोशल मीडियावर योग्य रीतीने केल्यास ते प्रेरणादायी ठरणार असून भविष्यातील आव्हानाचा विचार करत गुणवत्ता वाढीसाठी अधिकचे प्रयत्न करावेत असे आव्हान राज्य शिक्षक संघाचे सल्लागार बाळासाहेब काळे यांनी केले.
बाळासाहेब काळे शिक्षक सहकारी पतसंस्था पंढरपूर या संस्थेच्या वतीने विविध पुरस्कार वितरण प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक पाहुणे म्हणून बोलत होते.
         जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे चेअरमन रामभाऊ यादव यांनी प्रस्ताव केले यावेळी पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन मारुती शिरसागर माजी चेअरमन उत्तमराव जमदाडे दादाराजे देशमुख माजी संचालक रावसाहेब जाधव शिक्षक नेते कांतीलाल वाघमारे महिला आघाडीचे अध्यक्ष सरस्वती भालके प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग नाईक नवरे संचालक शेखर कोरके आबासाहेब जाधव वर शितल नागणे नारायण खेरडे महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष वैशाली आहेर सरचिटणीस सुप्रिया कांबळे कोषाध्यक्ष विजय पांढरे बालाजी जमदाडे कार्यकारी अध्यक्ष संपतराव देशमुख सरचिटणीस राहुल आडवे कार्याध्यक्ष विकास कांबळे कोषाध्यक्ष बापूसाहेब काळे संपर्कप्रमुख गणेश होणकळस जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा बाबर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

* शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर :- रामभाऊ यादव 
 "संस्थेच्या माध्यमातून शिक्षकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी तत्पर असून वरिष्ठांचे मार्गदर्शन व सहकारी  सदस्यांचे सहकार्य घेऊन हे कार्य अधिक विस्तृत करणार असून त्यांच्या आत्ताच्या सहकार्याबद्दलही माझा सलाम आहे" 

Post a Comment

0 Comments