लोकपर्व न्यूज नेटवर्क:-
श्री विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या वतीने दिनांक ६ सप्टेंबर पासून कारखान्याच्या सभासदांना व ऊस पुरवठादार करणाऱ्या शेतकऱ्यांना अशा सुमारे ३५ ते ४० हजार ऊस खातेदारांना घरपोच साखरपुरवठा होत असल्याची घोषणा कारखान्याची चेअरमन आमदार बबनदादा दादा शिंदे यांनी नुकतीच केली.
याबाबत अधिक माहिती देताना कार्यकारी संचालक संतोष डिग्रजे यांनी कारखाना युनिट नंबर एक व युनिट नंबर दोन या दोन युनिट मार्फत प्रत्येक पोस्टपर्वतदार सभासदा खातेदारास 50 किलो साखर वाटप करण्यात येणार असून सुमारे 20000 क्विंटल साखर लागेल असे सांगत प्रत्येक शेती विभागाच्या गट विभागानुसार त्याचे वाटप होणार असल्याचे सांगितले.न
सोलापूर जिल्ह्यात सर्वप्रथम साखर घरपोच करण्याची सुविधा माजी आमदार स्व. सुधाकरपंत परिचारक यांच्या संकल्पनेतून पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने राबवली त्याचाच धडा सध्या श्री विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून राबवला जात आहे साखर घरपोच सुविधा निर्माण करून बबन दादाचा गोडवा आणि सणासुदीत व निवडणुकीच्या तोंडावर आ. बबनदादा गोडवा वाढण्याचा प्रयत्न घरपोच साखरेने केला असल्याचे बोलले जात आहे.
पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने गत वेळेस लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेचा अंदाज घेत गुढीपाडवा सणाची साखर ही कारखाना साइटवर व कारखान्याच्या वाखरी येथील कार्यालयातून वाटप केली होती त्या अगोदर घरपोच साखर सुविधा केली होती. सध्या पांडुरंग कारखाना कोणता निर्णय घेणार याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे त्याचबरोबर
विठ्ठल सहकारी साखर कारखाना सहकार शिरोमणी साखर कारखाना ,श्री संत दामाजी साखर कारखाना ,भीमा सहकारी साखर कारखाना, सहकार महर्षी सहकार कारखाना, सिताराम सहकारी साखर कारखाना, लोकमंगल, सिद्धेश्वर या कारखान्याबरोबरच सोलापूर जिल्ह्यातील अन्य कारखाने साखर वाटपाबाबत नेमकी भूमिका काय...? याकडेच लक्ष लागले आहे .
गौरी - गणपतीचा, दसरा .. दिवाळी ... या सणाच्या पार्श्वभूमीवर सभासदांचे साखरे कडे लक्ष लागले आहे त्यामुळे वरील कारखान्यानी कोणती भूमिका निभावणार यावरच काही प्रमाणात विधानसभा निवडणुकीतील गोडवा ही वाढू शकतो असा अंदाज बांधला जात आहे.
पंढरपूरच्या विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी तीन हजार पाचशे दर जाहीर केला तर माढा तालुक्यातील विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे चेअरमन आ. बबनदादा शिंदे यांनी घरपोच साखर वाटप करून गोडवा निर्माण केला आहे सध्यातरी सोलापूर जिल्ह्यातील दोन "विठ्ठल" कारखान्याच्या माध्यमातून चांगलाच विधानसभेपूर्वीच कलगीतुरा रंगात आहे.
0 Comments