दि. २२/०८/२४
लोकपर्व न्यूज नेटवर्क:-
पंढरपूर तालुक्यातील चळे येथील कै. कांतीलाल मोरे कला, क्रिडा, सांस्कृतिक मंडळाच्या वतीने मंडळाच्या २६ व्या स्थापना दिनानिमित्त व
कांतीलाल मोरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मंडळाच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेस सुमारे १६ हजार रुपये किमतीचा स्पीकर संच भेट म्हणून दिला.
मंडळांने यापूर्वीही विविध सामाजिक उपक्रम राबवून गावांमध्ये व परिसरात आपला वेगळा ठसा उमटवला आहे गतवर्षी मंडळाने आट्या-पाट्याचे सामने भरूवून मंडळाचा व सामन्याच्या आयोजनाचे रौप्य महोत्सव वर्ष साजरे केले होते. वृक्षारोपण, गरजू व्यक्तींना मदत, क्रिकेट संघांना मदत, स्पर्धेसाठी संघ तयार करून पाठवणे, शालेय विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे इत्यादी उपक्रम मंडळाने राबवले आहेत.
यावेळी माजी उपसरपंच भास्करराव मोरे , संभाजी ब्रिगेडचे जिल्हा संपर्कप्रमुख डॉ .रामदास घाडगे, मंडळाचे मार्गदर्शक व श्री दर्लिंग अन्नक्षेत्र मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र मोरे, डॉ. सुहास मोरे, अमित मोरे , निखिल मोरे, सज्जन मोरे ,राहुल मोरे, संभाजी कुंभार, श्रीकांत पंडीत , शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना जगताप, सहशिक्षक सतिश बुवा, प्रशांत ठाकरे, आण्णासाहेब रायजादे, विकास बढे, रेखा जाधव, राणी बाड, सुलभा कुंभार उपस्थित होते.
या वेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक वर्षी शाळेसाठी वेगळा उपक्रम राबवण्याचा संकल्प केला.
0 Comments