दि.२१/०८/२४
लोकपर्व न्यूज नेटवर्क:-
पंढरपूर तालुक्यातील चळे येथील श्री दर्लिंग विद्यामंदिर व भास्करप्पा गायकवाड कनिष्ठ महाविद्यालयात संपूर्ण भारतात पवित्र समजला जाणारा रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 
श्री दर्लिंग विद्यामंदिर व स्व.भास्करअप्पा गायकवाड कनिष्ठ महाविद्यालयात रक्षाबंधन सण साजरा करताना विद्यार्थी बंधू भगिनी .
 महाविद्यालयात बहीण भावाच्या नात्यातील गोडवा जपला जावा. हा सण पराक्रम, शौर्य, संरक्षण करणे , यश संपादन करणे, संकटाचा सामना करण्यासाठी सामर्थ्य मिळो , या सुयश चिंतनाने साजरा केला जात असल्याने महत्वाचा सण व संस्कार जपण्याचा प्रयत्न या महाविद्यालयात केला .
 त्याचबरोबर चळे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत   इयत्ता १ ली ते  ४ थीच्या वर्गात रक्षाबंधनाचा  सण साजरा करण्यात आला .
  महाविद्यालयात व प्राथमिक शाळेत सर्व मुलींनी  आपल्या वर्गातील मुलांना राख्या बांधल्या व ह्या राख्यांच्या बदल्यात सर्व विद्यार्थ्यांनी बहिणींना ओवाळणी म्हणून पेन, वही, शालेय साहित्य गिफ्ट स्वरूपात दिले. 
 

0 Comments