लोकपर्व न्यूज नेटवर्क:-
पंढरपूर तालुक्यातील चळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. या विद्यार्थ्यानी कृष्ण, राधा, गोपाळ, गोपीका रंगीबेरंगी वेशभूषा सादरीकरण करुन लक्ष वेधून घेतले . यावेळी विविध विद्यार्थ्यांनी आणलेले पदार्थ एकत्रित करून सर्वांना वाटत गोपाळकाला ही साजरा करण्यात आला.
विविध वेशभूषेतील गोपाळ व गोपिका
तत्पूर्वी विद्यार्थी , शिक्षक, माता - पालक सभा संपन्न झाली. या सभेत विद्यार्थ्यां ची शैक्षणिक वाटचाल, विविध कला कौशल्य, शाळा, शिक्षक, इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमात सखी - सावित्री मंच स्थापन करणे, मोबाईलचा मर्यादित वापर या विषयावर यावर चर्चा झाली.
यावेळी स्वागत व प्रस्ताविक मुख्याध्यापिका कल्पना जगताप यांनी केले,
सहशिक्षिका राणी खांडेकर, रेखा जाधव यांच्या सह सर्वच विषय व वर्ग शिक्षकांनी विविध विषयांवर मते मांडले. पालकांनी ही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत अनेक प्रश्नांची उकल केली. या वेळी व्यवस्थापन अध्यक्ष अतुल सटाले, उपाध्यक्षा अश्विनी वाघ, सदस्या सृष्टी मोरे, उज्वला वाघ, चांदणी पंडीत, आश्वीनी लोखंडे, सज्जन मोरे, अँड .आनंद मोरे उपस्थित होते. दोन्ही कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सतिश बुवा, प्रशांत ठाकरे, विकास बढे, अण्णासाहेब रायजादे, सुलभा कुंभार यांनी परिश्रम घेतले.
0 Comments