लोकपर्व न्यूज नेटवर्क:- लोकसभा निवडनुकीची निकालाची धुळवड थांबते ना थांबते तो पर्यंत महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची लगीनघाई घोंगावू लागली आहे त्या अनुषंगाने अनेक नेते, विविध पक्ष , संघटना यांचे दौरे, बैठका, यांच्या यात्रा, रॅली, इशारे व विविध पक्षांच्या नेत्यांची अंदाजीत वक्तव्याची संख्येत वाढ होवू लागली आहे तर बहुतांश मतदार संघात एकाच पक्षातील असलेल्या आणि महायुती व महाविकास आघाडीच्या अनेक इच्छुकांना बंडखोरीच्या पालव्या फुटू लागल्या आहेत .
आजच्या सोलापूर च्या शरद पवार यांच्या दौ-याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
"सात ऑगस्ट रोजी सोलापूरात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी 29 ऑगस्ट पर्यंत मुदत देत शांतता रॅलीची दुसऱ्या टप्प्यास प्रारंभ केला त्यात अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांचा समाचार घेतला. व आता आरक्षण नाही तर सत्ताच घालवू असे सुतोवाच केले..
तत्पूर्वी सोलापूरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही, द्यायचे असेल तर आर्थिक निकषावर द्या असे वक्तव्ये करुन एकच खळबळ उडवून दिली व संघटक दिलीप धोत्रे यांची पंढरपूरातून उमेदवारी घोषित केली.
त्यानंतर शिवसेना (उबाठा) उध्दव ठाकरे यांच्या दिल्लीतील सहकुटुंब दौऱ्याची आतील व बाहेरील बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्यांच्या सेनेने ही भगव्या सप्ताहाचे आयोजन चालू आहे.
काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मविआच्या १८३ जागा निवडून येणार असा दावा ठोकला तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जुन्नर मधून प्रारंभ करण्यात आलेल्या शिवस्वराज्य यात्रेत आघाडी १७० जागा निवडून आणू असा वश्वास व्यक्त केला.
तर नाशिक जिल्ह्यातून सुरू झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या त्यांच्या राष्ट्रवादी ची जनसन्मान यात्रा सुरू केली असून त्यांनी लाडकी बहीण योजनेची कार्यवाही व निधी अधिक गतिमान करणार असल्याची घोषणा केली. आणि आम्हाला आरक्षणाच्या बाबतीत कुणालाही नाराज करायचे नाही सर्वांना बरोबर घेऊन पुढे जायचे आहे असे सांगितले. महायुतीची जागा वाटपाच धोरण ठरले असल्याचा गौप्यस्फोट केला.
भाजपचे नेते गृहमंत्री अमित शहा हे या आठवड्यात महाराष्ट्राच्या तीन दिवशीय दौऱ्यावर येणार असल्याची माहिती मिळत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ही मराठा समाजाला कायदेशीर बाबीवर टिकणारे आरक्षण निश्चितपणे देणार असल्याचा पुनरुच्चार पुन्हा एकदा करत आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका सर्वांना बरोबर घेऊन जायचे आहे हेही सांगायला ते विसरत नाहीत.
तर वंचित बहुजन आघाडीचे येते आरक्षण बचाव यात्रेच्या माध्यमातून ओबीसी समाजाला आरक्षण वाजवायचे असेल तर शंभर आमदार ओबीसीचे पाठवा असे आवाहन करत आहेत.
आणि विशेष म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील महाविकास आघाडी व महायुतीतील अनेक नेत्यांना "यंदा कर्तव्य आहे" या भूमिकेतून निवडणूक लढवण्याच्या व बंडखोरी करण्याच्या इराद्याने हालचाली वाढवल्या आहेत सर्वात जास्त काँग्रेस पक्षाकडे इच्छुक म्हणून मागणी मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. पंढरपूर, माढा, मोहोळ करमाळा, तालुक्यातून सत्ताधारी व इच्छुक एकमेकांना झाकली मूठ सव्वा लाखाची मानत कार्यकर्त्यांचा अंदाज घेत इशारे प्रतिइशारे देत असून महायुती महाविकास आघाडीत मतदारसंघ कायम राहणार की अदलाबदल होणार याची चर्चा होत आहे.
आणि विशेष म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील महाविकास आघाडी व महायुतीतील अनेक नेत्यांना "यंदा कर्तव्य आहे" या भूमिकेतून निवडणूक लढवण्याच्या व बंडखोरी करण्याच्या इराद्याने हालचाली वाढवल्या आहेत सर्वात जास्त काँग्रेस पक्षाकडे इच्छुक म्हणून मागणी मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. पंढरपूर, माढा, मोहोळ करमाळा, तालुक्यातून सत्ताधारी व इच्छुक एकमेकांना झाकली मूठ सव्वा लाखाची मनात कार्यकर्त्यांचा अंदाज घेत इशारे प्रति इशारे देत आहेत काहींनी अजून पत्ते उघड केले नाहीत. महायुती महाविकास आघाडीत मतदारसंघ कायम राहणार की अदलाबदल होणार याची चर्चा होत असून .
राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी पंढरपुरातून
विठ्ठल परिवारातील एक नेते इच्छुक असलेले सहकार शिरोमणी चे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या समर्थनासाठी अजित पवार राष्ट्रवादी गटाकडून जोरात हालचाली चालू असून त्यांचा कार्यअहवाल देण्यासाठी जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक साळुंखे पाटील, आ. संजय शिंदे, बबन शिंदे आ. यशवंत माने यांनी लावलेल्या फिल्डिंग कडे व राष्ट्रवादी च्या निर्णयाकडे सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. कारण पंढरपूर तालुका चार विधानसभा व दोन लोकसभा मध्ये समाविष्ट असल्याने व तुतारी राष्ट्रवादीला रोखण्यासाठी धडपड मात्र जोरात आहे.
तर याच मतदारसंघातून अनेकांना बंडखोरीच्या पालव्या देखील फुटू लागल्या असून सध्या राज्यातही विविध मतदारसंघात आघाडीत व महायुतीत बंडखोरी अटळ असल्याच्या चर्चा मात्र जोरात आहेत
0 Comments