व्यसनाची कीड  उखडून टाकण्यासाठी तरुणांनीच  पुढाकार  घ्यावा :- समीर वानखेडे 
महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान 
आयपीएस समीर वानखेडे आणि सिने अभिनेत्री क्रांती रेडकर यांच्या उपस्थितीती लक्षवेधी.
 दि.१७/०७/२४
लोकपर्व न्यूज नेटवर्क:-
 को ल्हापूर  येथून प्रसिद्ध होत असलेल्या दैनिक रोखठोकचा वर्धापन दिन व पुरस्कार वितरण सोहळा कोल्हापूर मध्ये मोठ्या दिमाखात साजरा झाला. रविवारी शाहू स्मारक भवन येथे झालेल्या या भव्य दिव्य कार्यक्रमास आयपीएस अधिकारी समीर वानखेडे आणि प्रसिद्ध सिने अभिनेत्री क्रांती रेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत थाटात साजरा झाला.
               सत्कारमूर्ती समवेत प्रमुख पाहुणे
 पाऊस असतानाही नागरिकांच्या प्रचंड गर्दीने सभागृह खचाखच भरून गेले होते. या पुरस्कर वितरण सोहळ्यास महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून सत्कारमूर्ती आले होते. नुकताच कोल्हापूरमध्ये दिवसभर पाऊस होता, पावसातही लोकांनी कार्यक्रमाला तुफान गर्दी केली होती. या कार्यक्रमास समीर वानखेडे आणि सिने अभिनेत्री क्रांती रेडकर यांची उपस्थितीने सर्वांना आनंददायी व प्रोत्साहीत   बनवले. 
        अनेकांना या जोडीच्या हस्ते  पुरस्कार वितरित करण्यात आले. सभागृहात प्रचंड जल्लोषाने आणि जोश होता.  
 या दैनिकावर अभिनंदनचा वर्षाव झाला. इतकी मोठी सेलिब्रिटी आणि ऑफिसर उपस्थित राहणे ही एक लक्षवेधी गोष्ट ठरली. काल दिवसभर हजारो वाचक आणि रोखठोक वर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी दैनिक रोखठोकच्या टीमचे कौतुक करून अभिनंदन केले.
व्यसनाची कीड तरुणांनी उखडून टाकायला हवी- आयपीएस समीर वानखेडे 
...देशात तसेच महाराष्ट्रात व्यसनाचे प्रमाण वाढत आहे. त्यासाठी समाज जागृती करून व्यसनाची लागलेली कीड तरुणांनी उखडून टाकायला हवी. असे आवाहन समीर वानखेडे यांनी याप्रसंगी केले. या मोहिमेत मी अग्रभागी असेल असेही त्यांनी ठणकावून सांगितले. 
 

0 Comments