LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

दानेश्वर मठाची अन्नदानाची परंपरा कायम; खरे परीवाराकडूनही या वर्षीपासून अन्नदान सुरू

लोकपर्व न्यूज नेटवर्क:  स र्वांचे लक्ष वेधून घेणारी व परंपरा जोपासून ते वृध्दींगत करण्याचे असे पवित्र अन्नदानाचे काम दानेश्वर मठामार्फत अविरत चालू असलेले दिसले सर्व वारकरी भक्तगणांनी आस्वाद घेतला. खरोखरच मठाच्या नावातच दानेश्वर हा असलेला शब्द तंतोतंत खरा होत आहे.

दानेश्वर मठामार्फत पंढरपूर च्या  आषाढी वारीत देण्यात येणाऱ्या अन्नदानाचा लाभ घेताना माय माऊली 

 हा दानेश्वर मठ कर्नाटक राज्यातील बागलकोट तालुक्यातील असून अगदी अन्नधान्य ते सर्पन, आचारी, मोठ्या  प्रमाणात तयार असतात मागेल  तेवढे भक्तांना  पुरवले जाते, अन्नदानाची कमतरता भासू दिली जात नाही, एवढेच नव्हे तर जेवनाची ताटे धुण्यासाठी सेवेकरी हजर असतात.

 ही अन्नदानाची परंपरा आप्पासाहेब चक्रवर्त मठामार्फत सूरु केली  असून ४२ वर्षांपासून अधिक काळ सूरु असून पुढे ही चालू राहणार आहे. ही अन्नदानाची सेवा दर्शन रांगेतील रिध्दी - सिध्दी गणपती  मंदिरासमोर सुरू असते.

स्व. गंगुबाई संभाजी शिंदे यांच्या स्मरणार्थ अन्नदान 

           याच परिसरात या वर्षापासून आषाढी वारीत  गोपाळपूर चे प्रसिद्ध उद्योजक राजू खरे परीवारा कडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मातोश्री स्व. गंगुबाई संभाजी शिंदे यांच्या स्मरणार्थ आषाढी एकादशी दिवशी खिचडी व फराळ  साहित्य वाटप  करुन अन्नदान केले . त्याचबरोबर वारीच्या दुसऱ्या दिवशी ही अन्नछत्र चालू होते.
 खरे  परीवाराकडून आषाढी वारी दिवशी फराळ साहित्याचे व दुसऱ्या  दिवशी शिरा  व भात वाटप करण्यात आले.


Post a Comment

0 Comments