कृष्णा तूच थांबव रे हे कृत्य भक्तांचे मोठ्या प्रमाणात आर्त धावाने आळवणी.
*कोण आनंदाने नाचतात.. कोण फेरा धरतात.. फुगडी खेळताना तल्लीन होऊन जातात. कुणाचा दोन मिनिटांचा विसावा.
लोकपर्व न्यूज नेटवर्क :- प्र संग तेरा जुलै यचा...ठीकाण गोपाळकृष्ण मंदिरातील
वारी निमित्ताने आलेला प्रत्येक वारकरी भावीक गोपाळपुरात आल्या वाचून राहत नाही . कृष्ण आणि विठ्ठल एकच स्वरुपात समजले जाते. गोपाळपूरात प्रथम दर्शन पायथ्याला असणाऱ्या जनाबाईच्या मंदिरापासून होते तेथे जनाबाईचा ताकाचा डेरा आहे, प्रथम भाविकांच्या रिक्षा, टांगा इथेच थांबतात.
पुढे काही अंतरावर गोपाळकृष्ण मंदिरात प्रवेश करत असताना पायऱ्या चढत असतानाच रखवालदराप्रमाणेच उभे असलेल्या पुजाराकडूनच अप्रत्यक्षरित्या सक्तीच्या दानाची मागणी करण्यास प्रारंभ होतो..! परंतु काहीजण बळी पडून देतात काहीजण न देता पुढे जातात.
त्यानंतर मंदिरात आत प्रवेश केल्यानंतर दत्त मंदिरापासून दर्शनाचा प्रारंभ होतो इथे तर सक्तीच्या दानासाठी भक्ता बरोबर उच्छंद मांडला जातो .. महिला भाविक कींवा जोडपे असल्यास जास्त मागणीचा रेटा लावला जातो.. इथे दर्शन घेताना पुजाऱ्याकडून ११ रुपये त्या जोडप्यास किंवा महिला भाविकांच्या हातात ठेवले जातात घरी गेल्यानंतर त्या अकरा रुपये चे रोज पूजा करण्यास सांगून पुढे शंभर रुपये ते पाचशे रुपये पर्यंत दान देण्यास आदेश दिला जातो. इथे अनेक भाविक ज्यास्त कुचंबतात तर पुढे कळीचा नारदमुनीचे( चिंतामणी) दर्शन त्यानंतर भगवान श्रीकृष्णाच्या मंदिराकडे दर्शनासाठी जावे लागते त्यानंतर संत जनाबाईचा संसार.. जाते... जनाबाईची गोधडी... त्यानंतर नवसाला पावणारा श्रीकृष्णाचा पाळणा... त्यानंतर श्रीकृष्ण अर्थात विठ्ठलाचे सासू सासरे राजाभिमक व राणी शुद्धमती.. यासह इतर अनेक दर्शनासाठी ठिकाणी आहेत मंदिराच्या प्रवेशद्वारावरच मातारुक्मिणीचे माहेरकडील नंदी याचे दर्शन घडते.
हे सर्व दर्शन करत असताना फक्त उल्हासित झालेला दिसतो काही जण तर आनंदाने नाचू बागडू लागतात .
काहीजण "राधा-कृष्ण" फुगडीत तल्लीन होऊन जातात.
फुगडी नाचत फेर धरत नाचत म्हणतात. राधा.. कृष्ण.. राधा..! राधा.. राधा.. राधा कृष्ण राधा..!
तरुणी सह वयस्कर महिला भक्त सुद्धा ओव्या स्वरपातील गाण्यात भजनात दंग होऊन जातात आणि म्हणतात..
आला मुराळी... आनंद झाला मनाला..! मला बाई जायचं विठूच्या पंढरपुराला...!
पंढरीची वाट लय भारी...! माझ्या पायाला आलेय बळ..!
आनंद झाला मनाला.!
दर्शनाने काहीजण उल्हासित होतात परंतु अनेक भक्तांच्या मनातील सक्तीचे होणारे दानमागणी पाहून अचंबित व खिन्नता वाढते म्हणतात कृष्णा तूच काढ रे मार्ग..! अशी आळवणीही करतात..!
दर्शन झाल्यानंतर बाहेर येताना काही काही जण फक्त
जरा विसाऊ या वाटेवर ( वळणावर ) म्हणत दोन मिनिटांचा विसावा घेतात..!
* असेही समाधान व्यक्त
गोपाळकृष्ण मंदिरातील दर्शन रांगेत उभारलेल्या जळगाव जिल्ह्यातील सिताराम पाटील नामक एका भाविकाने फोन केल्यानंतर आपल्या गावी पाऊस पडल्याचे खुशाली कळताच समाधान झाल्याचे भावना व्यक्त केली मी दर्शनाला आलो आणि माझ्या शेताकडे पाऊस पडला..!
गैरप्रकार थांबवण्यासाठी ताकीद देणार :-
इच्छा दानासाठी अवाहन केले जाते, सक्तीच्या दानाची मागणी केली जात नाही जर कोण सक्तीच्या दानाची भक्तांना सक्ती करत असेल तर संध्याकाळ पर्यंत मिटिंग घेवून सक्त भाविकांना त्रास न देण्याची ताकीद देण्यात येईल. गैरप्रकार घडू देणार नाही अशी प्रतिक्रिया विश्वस्त गुंडू गुरव यांनी दिली.
शासन व धर्मादाय आयुक्त लक्ष देईल काय..?
अशा वाढत्या प्रकारावर व विविध मंदिरातील पुजाऱ्यावर सक्तीची दानधर्म करण्याविषयी मागणी करण्यात येत असेल तर त्यावर शासन कठोर भूमिका घेणार का.? व धर्मादाय आयुक्त यावर नियंत्रण ठेवेल का..? शासनाचे यावर नियंत्रण असेल हवे अशी अपेक्षा समस्त वारकरी, भाविक वर्गातून व्यक्त होत आहे.
0 Comments