प्रतिनिधी :- लोकपर्व न्यूज नेटवर्क
रामायणाचार्य फुगारे गुरुजीनी आपल्या सेवा कालावधीत शिक्षकी पेशा बरोबरच सर्व सामान्यांचीआर्थिक बचतीच्या सवयी वाढवण्याबरोबरच चळे गावचा आध्यात्मिक वारसा वाढवला असे गौरवोद्गार कर्मयोगी सुधाकरपंत परीचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन जेष्ठ संचालक श्री दिनकरराव मोरे यांनी व्यक्त केले.
ते चळे ता. पंढरपूर येथील माजी मुख्याध्यापक व रामायणाचार्य ह.भ.प कुबेर फुगारे गुरुजी यांना विठाई शिक्षण संस्थेचा " जीवन गौरव" पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल व अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार समारंभ कार्यक्रमात अध्यक्षीय मनोगतात बोलत होते. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीष गायकवाड, संचालक हरी फुगारे, पांडुरंग चे संचालक सुदाम मोरे, दिलीप गुरव, विठ्ठलचे माजी संचालक संतोष गायकवाड पंचायत समितीचे सदस्य नवनाथ बंगाळे, सोसायटीचे माजी अध्यक्ष उत्तम गायकवाड, पेन्शनर संघटनेचे तालुकाध्यक्ष रमाकांत रसाळ, उपाध्यक्ष भानुदास शिंदे,सचिव मोहन रसाळ,
सुनिता देसाई,उषा खोत, माजी चळे केंद्रप्रमुख मच्छिंद्र मासाळ, ज्येष्ठ शिक्षक शंकर वाघमारे यांच्यासह पंढरपूर तालुक्यातील पेन्शनर संघटनेचे सर्व शिक्षक सभासद जिल्ह्यातील प्रतिनिधीसह आप्पासाहेब मोरे, सुधाकर मोरे नामदेव मोरे, शंकर शिंदे, दीपक मोरे, समाधान गायकवाड कृष्णा गायकवाड, मोहन वाघ, आर टी गायकवाड, गुंडू वाघ तुकाराम वाघमोडे डॉ.सुहास मोरे , डॉ.रामदास घाडगे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रमुख मान्यवरासह प्रा. ज्ञानेश्वर वाघमोडे प्रा. पटू गायकवाड, बंडु मोरे प्रताप गायकवाड बाळासाहेब मोरे, दत्तात्रय गायकवाड, संतोष गायकवाड , अतुल मोरे,यांनी मनोगत व्यक्त केले . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष वाघ, मोरेश्वर फुगारे, दत्ता माने , यांच्यासह परिवर्तन ग्रुपच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
* रामायणाचार्य ह.भ.प कुबेर फुगारे गुरुजी यांच्या अमृत महोत्सवी निमित्त त्यांचे औक्षण करण्यात आले, त्यांना यापूर्वी पंचायत समिती व जिल्हा परिषदेचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार, पोस्ट खात्यातर्फे सर्वोच्च बचत निधी गोळा केल्याबद्दल महाराष्ट्राचे माजी राज्यपाल पी.सी अलेक्झांडर यांच्या कडून सन्मान, तर नुकताच विठाई संस्था पंढरपूर तर्फे वारकरी जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे.
वरील छायाचित्रात माजी मुख्याध्यापक रामानाचार्य ह भ प कुबेर फवारे गुरुजी यांच्या सत्कार समूह कार्यक्रमात प्रमुख मान्यवर व उपस्थित ग्रामस्थ.
0 Comments