* चिंतामणी हरी मोरे चळे भूषण पुरस्काराने सन्मानित
* महाराष्ट्र दिनानिमित्त वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम .
* सिद्धनाथ वाचनालय व लोकविकास बचत गटाचा संयुक्त उपक्रम.
लोकपर्व न्यूज नेटवर्क:- माणसाला टेन्शन मधून वाचायच असेल तर पुस्तक वाचलं पाहिजे, वाचन माणसाला प्रगल्भ व आत्मनिर्भर बनवते असे मत ह.भ.प. राणा महाराज वासकर (पंढरपूर) यांनी व्यक्त केले ते पंढरपूर तालुक्यातील चळे येथील सिद्धनाथ सार्वजनिक मुक्त वाचनालय व लोकविकास शेतकरी बचत गट यांच्यावतीने विविध क्षेत्रातील व्यक्तींना देण्यात येणाऱ्या "लोकविकासाचे सिद्धनाथ" या पुरस्कार वितरण कार्यक्रमात अध्यक्षीय स्थानावरून बोलत होते. त्यानी ज्ञानेश्वरी ग्रंथ हा ही शेतीपूरक ग्रंथ असून संत तुकारामाचे वाड्मय ही शेतीचे महत्व अधोरेखित करतात असे स्पष्ट केले.
चळे येथील सिद्धनाथ वाचनालय व लोकविकास शेतकरी बचत गटाच्या वतीने लोक विकासाचे सिद्धनाथ या पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलताना ह. भ. प. राणा महाराज वासकर व मान्यवर
या पुरस्काराचे वितरण राकेश गायकवाड ( मंगळवेढा ) अँड. प्रतापराव मोरे यांच्या शुभहस्ते तर वीर सैनिक पिता मुन्नागीर गोसावी , जि.प. चळे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कल्पना भुसे , श्री दर्लिंग विद्यामंदिर चळे शाळेच्या सहशिक्षिका प्रा. सुलभा गायकवाड , दत्तात्रय गायकवाड, अक्षय मोरे, ह.भ.प.नारायण व हे.भ.प. कबीर महाराज, यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. श्री दर्लिंग चळे भूषण पुरस्काराने पोलिस उपनिरीक्षक श्री चिंतामणी हरी मोरे यांना सन्मानित करण्यात आले.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज जेष्ठ कृषीनिष्ठ पुरस्कार श्री महादेव वाघमोडे, संत सावता माळी युवा उपक्रमशील शेतकरी पुरस्कार श्री रामचंद्र सिध्दवाडकर ( आंबे) महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस व शहीद विठ्ठल मिसाळ स्मृती गौरव पुरस्कार शहीद मेजर कुणालसिंह गोसावी कुटुंबीय (पंढरपूर) महात्मा फुले आदर्श शिक्षक प्राथमिक सतीश बुवा, डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम आदर्श शिक्षक माध्यमिक विजयचंद्र पाटील, जिजाऊ सावित्री अहिल्या यशोदिप अंगणवाडी जालीहाळ वस्ती मंजुषा कुंभार (सेविका) मदतनीस नीलम ओहोळ , स्वामी विवेकानंद उद्योजक युवा प्रेरणा पुरस्कार दत्ता करे पुणे, कर्मवीर भाऊराव पाटील व डॉ बाबासाहेब आंबेडकर गुणवंत विद्यार्थी पुरस्कार यश बनसोडे, गणेश सुरवसे, डॉ. एस आर रंगनाथन आदर्श ग्रंथ वाचक पुरस्कार सविता कुंभार, श्री अंगद सोनवणे, श्री राकेश काळे, अण्णाभाऊ साठे आदर्श विद्यार्थी वाचक पुरस्कार आतिश पवार, करण पवार ज्ञानेश्वरी मस्के, प्रतीक्षा माने, आचार्य बाळशास्त्री जांभेकर नियमित वृत्तपत्र वाचक पुरस्कार नामदेव शिंदे (रांझणी) लोकविकास शेतकरी बचत गटाकडून राजश्री शाहू महाराज उत्कृष्ट गुंतवणूकदार ्हणून डॉ. महेश्वर गायकवाड, सौ मंगल दत्तात्रय मोरे, तर "गर्जा महाराष्ट्र माझा" नियमित गुंतवणूकदार पुरस्कार म्हणून किरणधनश्री गायकवाड इत्यादिना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. हे पुरस्काराचे दुसरे वर्ष असून महाराष्ट्र दिनानिमित्त वाचनालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षापासून
हे पुरस्कार देण्यात येत आहेत.
* यांनी केले शेतीविषयक मार्गदर्शन
या कार्यक्रमात आस्था राज्यस्तरीय शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी दत्तात्रय गायकवाड, संत सेना महाराज वाचनालय आव्हे वाचनालयाचे अध्यक्ष युवराज गायकवाड यांनी शेतीविषयक विविध माहिती देत पिकाविषयी व खताविषयी उत्पादनाविषयी बाजारपेठ इत्यादीची माहिती दिली.
* मोबाईलचा अतिरिक्त वापर टाळा; पुस्तकांना सोबती बनवा.:- राकेश गायकवाड
सध्या समाजात मोबाईलचा प्रमाणापेक्षा अधिक वापर होताना दिसत आहे "माणूस" मोबाईल खेळणारा चौथा माकड बनतो की काय अशी भीती निर्माण झाली आहे. मोबाईल मधील माकड बनण्यापेक्षा पुस्तक वाचन करून, पुस्तकांना सोबती बनवून विचारवंत बना असा सल्ला स्व. संजय सविता स्मृती सार्वजनिक वाचनालय मंगळवेढा चे अध्यक्ष राकेश गायकवाड यांनी दिला. सत्कारमूर्तीच्या वतीने प्रातिनिधिक मनोगत प्रा. ज्ञानेश्वर वाघमोडे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत वाचनालयाचे अध्यक्ष अतुल मोरे, सूत्रसंचालन डॉ. प्रशांत ठाकरे आभार अँड. प्रतापराव मोरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, कांतीलाल सरिक महाराज, चंद्रशेखर आझाद वाचनालयाचे अध्यक्ष सुधाकर घाडगे देगाव, शिवाजी मोरे, दर्लिंग मोरे, प्रशांत मोरे, सुरेखा सुरवसे, मंजुषा कुंभार यांनी परीश्रम घेतले.
हा कार्यक्रम श्री संत बाळूमामा मंदिर सभागृहात संपन्न झाला.
फोटो ओळी:- चळे ता. पंढरपूर येथे लोकविकासाचे सिद्धनाथ पुरस्कार वितरण प्रसंगी राणा महाराज वासकर, कबीर महाराज, नारायण महाराज, मुन्नागीर गोसावी, प्रताप मोरे, दत्तात्रय गायकवाड, प्रा. ज्ञानेश्वर वाघमोडे , अतुल मोरे, सुधाकर घाडगे.
0 Comments