राजकीय .....
रंग राजकारणाचा
लोकपर्व न्यूज नेटवर्क:- लो कसभेची लगीनघाई सध्या जोरात आहे अनेकांना उमेदवारी ची वरमाला हातात आली (मिळाली) आहे. ते बोहल्यावर जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. अनेक इच्छुक उमेदवार आपापल्या पक्षाच्या उमेदवारीचे तोरण हातात घेण्यासाठी धोरणाची वाट बघत आहेत . उमेदवार जाहीर करण्यात भाजपने राज्यात आणि सोलापूरातही आघाडी घेतली आहे. सोलापूर लोकसभा अंतर्गत दोन लोकसभा मतदारसंघा पैकी माढ्याचे तिकीट जाहीर करून रणजितसिंह निंबाळकर यांना बोहल्यावर चढवले आहे. अजून जिल्ह्यातील इतर कोणत्याही पक्षाने अनधिकृतपणे .. अधिकृत पणे ही खासदारकीची उमेदवारी जाहीर केली नाही. परंतु सोलापूर जिल्ह्यात काही तालुक्यात लगीनघाई लोकसभेची.. परंतू अनेकजन विधानसभेत जाण्यासाठी लवाजमा तयार ठेवत आहेत. म्हणजे लगीन खासदारकीच ... त्यात दिवाने आमदार.. इच्छुक आमदारकीचे उमेदवार झाले
आहेत.
संग्रहित व्यंगचित्र छायाचित्र
यालाच काहीवेळा बेगाने शादी मे अब्दुल्ले दिवाने ..! बहुत हो रहे है..! अशी मिश्किल टिपण्णी ही केली जात आहे.
यात मोहळ विधानसभा मतदारसंघ आघाडीवर आहेत या तालुक्यात ७ जण, त्यानंतर माढा ४ आणि पंढरपूर - मंगळवेढा साठी ५ , दक्षिण सोलापूर चार, करमाळा तीन, सांगोला ५ , शहर मध्य ४, शहर उत्तर ४ मधून आमदारकीचे उमेदवारीचे अब्दुल्ले दिवाने झाले आहेत. त्यांच्यात दावे...प्रतिदावे...वाद..विवाद.. मतदार संपर्क अभियान. काहीनी कामाची उद्घाटने, कामे जाहीर.. करुन आपली मनसुबे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी उरकली आहेत. तोपर्यंत मात्र बेगाने ( लोकसभेच्या ) शादी मे अब्दुल्ले ( आमदारकीचे इच्छुक उमेदवार ) दिवाने....! पात्र झाल्याचे पहावयास मिळत आहेत. थोड्या फार फरकाने संपूर्ण महाराष्ट्रात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
0 Comments