LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

चळेच्या महिलांनी काढल्या रांगोळ्या, केला स्वयंपाक, घेतला लिंबू- चमचा गेल्या तळ्यात.. मळ्यात..! खेळ मांडला संगीत- खुर्चीचा जिंकली मने आणि बक्षिसे...!

१६/०३/२४

लोकपर्व  न्यूज नेटवर्क :-  पं ढरपूर तालुक्यातील चळे येथे जागतिक महिला दिनानिमित्त १३ मार्च रोजी महिलांच्या अंगभूत विविध कला गुणांना वाव देण्यासाठी चळे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत विविध स्पर्धा घेण्यात आल्या त्या स्पर्धेत अनेक महिलानी उत्स्फूर्त पणे सहभाग नोंदवला .  महिला दिनानिमित्त भरवण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेत.
           स्पर्धेतील काही रांगोळी छायाचित्रे 

 सौ. मणिषा फुगारे (प्रथम), सौ. पल्लवी  रणवरे,( द्वितीय ) सौ. माधुरी माने ( तृतीय) तर उत्तेजनार्थ सौ. सुप्रिया सटाले, सौ. प्रियंका सटाले  तर पाककला अर्थात खाद्यपदार्थ स्पर्धेत
                       खाद्यपदार्थ छायाचित्रे 

 सौ. सुनिता मोरे, सौ. भाग्यश्री शिंदे, सौ. एम.एम. फुगारे, सौ. सृष्टी मोरे, सौ.ज्योती मोरे,  अनुक्रमे १ ते पाच क्रमांक पटकावले आणि उत्तेजनार्थ  सौ. उज्वला वाघ, सौ. करीश्मा काझी, सौ. पी. ए. रणवरे तर लिंबू चमच्या स्पर्धेत  

सौ. सुनिता मोरे, सौ. माधुरी माने, सौ. वैशाली रोकडे यांनी १ते ३ क्रमांक पटकावला तर तळ्यात- मळ्यात स्पर्धेत  

सौ. ज्योती  मोरे, स्नेहल मोरे, सौ. सारीका वाघ, यांनी यश संपादन केले   संगीत खुर्चीत 

सौ. एस.ए. मोरे, सौ. यु.एस. वाघ , सौ. एम. व्ही माने यांनी प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावला. 
स्पर्धेचे उद्घाटन सौ. तृप्तीताई खरे यांच्या हस्ते करण्यात आले .  त्यांच्या समवेत गोपाळपूर च्या उपसरपंच उषाताई बनसोडे उपस्थित होत्या.  
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका कल्पना भुसे, स्वाती नागणे, सुलभा कुंभार, मंजुषा कुंभार, निलम ओहळ, सतिश बुवा, प्रशांत ठाकरे, विकास बढे, आण्णासाहेब रायजादे, यांनी परिश्रम घेतले.  
सौ. चंद्रभागा घाडगै, ग्रामपंचायत  सदस्या सौ. दिपाली गायकवाड , डॉ . सौ वैशाली गायकवाड, अश्विनी वाघ, सारीका वाघ ,  यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.  
या कार्यक्रमास स्पर्धेतील विजया सह उपस्थित महिलांना मी भेट वस्तू देण्यात आल्या. प्रमुख पाहुण्या सौ. तृप्तीताई खरे यांनी हळदी कुंकू कार्यक्रमा निमित्त मिठाई वाण साहित्य दिले.

Post a Comment

0 Comments