१६/०३/२४
राजकीय
निवडणुकीतील राजकारण
लोकपर्व न्यूज नेटवर्क:- लो कसभा निवडणूकीचे नुकतेच १६ मार्च २०२४ रोजी देशाचे निवडणूक आयुक्त यांनी दुपारी तीन वाजता निवडणूक सात टप्प्यावर होणार असून त्याचा कालखंड १९ एप्रिल ते १ जून असून अंतिम निकाल ४ जून रोजी होवून १६ जून रोजी नवीन संसदीय मंडळ अस्तित्वात येणार हे आता निश्चित झाले असून त्या दृष्टीने देशातील प्रशासकीय यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. हा झाला निवडणूक यंत्रणेचा भाग.
परंतु एक अनुत्तरित प्रश्न जाणवू लागला आहे की या निवडणुकीत बनावट जातीचा योग्य रीतीने तपासला जाणार का..? या पुर्वी ज्यांचे बनावट दाखले आहेत असा आरोप आहे तो प्रश्न अजून सुटला नाही. तो निर्णय केव्हा लागणार... सुटणार.? निवडणूका होवून .. पुन्हा त्याच ठिकाणच्या निवडणूका आल्या जर निर्णय होत नसेल तर जनतेने काय बोध घ्यावा असा चविष्ट प्रश्न मतदारातून चर्चिला जात आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघात सोलापूर चे खासदार जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांचा बनावट जातीचा दाखला आहे अशी तक्रार झाली, आता खासदारकी संपुष्टात येणार..? अशी चिन्हे असतानाच मुळ तक्रारदार च संपले ... खादारकीचे पाच वर्षे ही संपली मात्र निर्णय झाला नाही तो प्रश्न आता नव्या प्रविष्ट आहे असे भाजपचे मंत्री ना. गिरीश महाजन सांगून तो बनावट जातीच्या दाखल्याचा प्रश्न पडद्यामागे नेला.
परंतु तीन - चार दिवसांपूर्वी सोलापूर लोकसभा मतदार संघातील मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे आ. यशवंत माने यांच्या विरोधात ही त्यांचा जातीचा दाखला बनावट व खोटा असल्याची तक्रार मोहोळ मधील युवक कार्यकर्ते सोमेश क्षीरसागर यांनी केले. त्यानी विमुक्त जाती व अनुसूचित जाती अशा दोन दाखल्याचा वापर केला असल्याचा आरोप आहे. त्यांचीही आमदारकीची चार वर्षे पूर्ण झाली आहेत, जातीचे दाखले खोटे की खरे..? हा प्रश्न ही अनुत्तरित ठरत आहे.
दहा - पंधरा दिवसांपूर्वीच सोलापूर लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक म्हणून नाव पुढे आलेले गत माळशिरस विधानसभा निवडणूक थोडक्यात जिंकण्यात हुकलेले उत्तम जाणकर. यांच्या वर ही माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी उत्तम जाणकर यांनी बनावट जात प्रमाणपत्र मिळवले आहेत असा आरोप ठेवला आहे व त्यांची मूळ जात वेगळी असल्याचे सांगितले. तर उत्तम जाणकर यांनी माझा जातीचा दाखला न्यायालयाने वैध ठरवला असल्याचे जाहीर केले. हा सर्व त्यांचा जातीचा प्रश्नाची खरी "जाण' कारांनाच 'उत्तम' रित्या माहीत असणार...! हे मात्र निश्चित
तो पर्यंत तो ही एक अनुत्तरित प्रश्नच..? प्रश्न
0 Comments