LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

सोलापूर जिल्ह्यात राजकारणाची जोराची हवा...! या ठिकाणी खासदार, आमदार होणार नवा..! नव्यानेच...?

२४/०३/२४

रंग राजकारणाचा:- रविवार विशेष 

लोकपर्व न्यूज नेटवर्क:- सोलापूर जिल्ह्यात लोकसभेची "हवा" जोर- जोरात निर्माण झाली आहे. २०१९ च्या लोकसभेची निवडणूकीची हवा बदलली आहे. सोलापूर  जिल्ह्यात  'सोलापूर राखीव व माढा खुला ' असे मतदारसंघ आहेत . या दोन्ही मतदार संघाची २००९ ला पुनर्रचना झाली. सोलापूर लोकसभा मतदारसंघ २००९ ला काँग्रेस, २०१४ ला आणि १९ ला भाजप जिंकली. तर माढा लोकसभा मतदारसंघात २००९,  २०१४ ला एकसंघ राष्ट्रवादी विजयी झाली तर २०१९ ला भाजपाचे कमळ फुलले. परंतु  आता मागील सर्व निवडणुकीतील हवा यंदाच्या निवडणुकीत दिसत नाही. लोकसभा निवडणुकीतील हवेची दिशा बदलली आहे.. कांहीं राजकीय पक्षाने उमेदवार ठरवले आहेत अजून काही ठरवण्याच्या उंबरठ्यावर आहेत उमेदवार ठरवताना अनेकांची दमछाक  व गोची होत आहे झाली आहे.
             सोलापूर लोकसभा मतदारसंघात निश्चित झालेल्या काँग्रेसचे उमेदवार आ. प्रणिती शिंदे यानी प्रचारात सध्यातरी  आघाडी घेतली असून त्यांचा अक्कलकोट, दक्षिण सोलापूर मोहोळ, पंढरपूर, मंगळवेढा, या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाचा का होईना संकल्प व संपर्क दौरा संपन्न झाला आहे. त्यांना सपोर्ट देण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह काँग्रेसचे आजी-माजी , आमदार , नगरसेवक, पदाधिकारी कार्यकर्ते सरसावले आहेत.
         तर माढा लोकसभा मतदारसंघात नुसतं... आमचं ठरलंय.! म्हणत,  उमेदवारी कोणत्या पक्षाकडून  हे १२ एप्रिल रोजी ठरणार असल्याचे सांगणारे जनभावना जाणून घेत असणारे  माढा लोकसभेचे इच्छुक  उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांचाही करमाळा, सांगोला, माढा, पंढरपूर, माण खटाव, फलटण या तालुक्यात छोटेखानी दौरे संपन्न झाले असून त्यांच्या पाठीमागे त्यांचा संपूर्ण परिवार ही जनभावना जाणून घेण्यासाठी "चौफेर" फिरत असल्याचे दिसत  आहे. 
महाविकास आघाडी कडून राष्ट्रीय समाज पक्षाला जागा सोडण्यात आले असून त्यांचे नेते महादेव जानकर यांना उमेदवारी फिक्स समजण्यात आली आहे. 
तेढा बनलेल्या माढ्यात भाजप महायुती - महाविकास आघाडी- मोहीते पाटील , असाच रंगणार तिरंगी सामना.! 
                 या उलट चित्र सोलापूर लोकसभा मतदार संघात दिसून येत आहे कारण सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजप मित्र पक्षाचे पाच आमदार असूनही घाबरगुंडी उडाली असून अनेक उमेदवाराची नावे गुंडाळून- धुंडाळून शेवटी आ.राम सातपुते, आ. विजयकुमार देशमुख , उत्तम  जानकर , कोमल ढोबळे , ज्योती वाघमारे  या नावाभोवती नुसतीच हवेतील चर्चा  होऊ लागली आहे. तर माढा लोकसभा मतदारसंघात भाजपने खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी निश्चित देऊनही पाच समर्थक मित्र पक्षाचे आमदार असूनही तिथेही  त्रेधा उडाली असून सध्या माढा हा 'तेढा' बनला आहे. तर या दोन्ही लोकसभा निवडणुकीतील सध्याच्या वातावरणाचा राजकीय बदलत्या  "हवा"मान अंदाजानुसार, खासदार होणार नवा... नव्याने असे चित्र समोर येत आहे. तर त्याच अंदाजानुसार माढा लोकसभा अंतर्गत सांगोला, माळशिरस करमाळा,  
       तर  सोलापूर लोकसभा अंतर्गत मोहोळ, शहर मध्य, दक्षिण सोलापूर, शहर उत्तर, या ठिकाणी ही  आमदार  नवा... नव्याने होणार..? अशी चर्चेतील जोराची सोलापुरी  "हवा" मात्र महाराष्ट्रात पोहचली आहे..!  
उमेदवारी अर्ज भरण्याची अधिसूचना अथवा सुरुवात १२ एप्रिल पासून सुरू होणार असल्याने १२ एप्रिल ला वेगळीच हवा  असणार आहे हे मात्र निश्चित.

                        रविवार  रंग राजकारणाचा  


Post a Comment

0 Comments