LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

भाजपला सोलापूर लोकसभेसाठी या तीन नावा पैकी एकाचा विचार करावा लागणार...? हॅट्रिक विरुद्ध हॅट्रिक अशी शक्यता अधिक वाढली..!

२४/०३/२४
लोकपर्व न्यूज नेटवर्क/ सो..लापूर ,लोकसभेसाठी अनेक नावे धोंडाळून अजून कोणत्याच नावापर्यंत उमेदवारीवर शिक्का मुहूर्त करू न शकलेल्या भाजप समोर आता फक्त तीन नावे उरली आहेत ती म्हणजे शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख, माळशिरसचे नवखे आमदार राम सातपुते धनगर समाजाचे नेते म्हणून उत्तमराव जानकर ही फक्त आता तीन नावे  आहेत यापैकी एकाचे नाव जाहीर करण्याशिवाय सध्या तरी भाजप समोर पर्याय उरला नाही. 

               १)   सध्या सोलापूर भाजप समोर आमदार विजयकुमार देशमुख यांचे सर्वार्थाने नाव खुणावत आहे कारण काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी आमदारकीच्या हॅट्रिक पूर्ण केलेले आहेत त्या तुलनेत आमदार देशमुख यांनीही आमदारकीची हॅट्रिक पूर्ण केलेली आहे. आमदार प्रणिती शिंदे यांच्या पाठीमागे जसा आता सर्वपक्षीय गोतावळा वाढू लागला आहे तसंच आमदार देशमुख यांच्या पाठीशी ही सोलापूर मार्केट कमिटीचे सभापती या नात्याने अनेक सर्वपक्षीनेतेशी संबंध आलेले आहेत. कारण त्याने मोठ्या मुश्किलीने मार्केट कमिटीवर काँग्रेसची व विरुद्ध पक्षाचे सत्ता असतानाही सभापती भाजपचा अशी बिरुदावली सार्थ ठरवली आहे. आणि विशेष म्हणजे आला अंगावर घेतला शिंगावर अशी ताकद त्यांनी ठेवली आहे..? असे त्यांचे समर्थक बोलू लागले आहेत.
        २) हा पर्याय सोडून भाजप समोर दुसरा पर्याय माळशिरसचे विद्यमान आमदार आमदार राम सातपुते यांच्या रूपाने उभा आहे एक शिस्तबद्ध आमदार माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू शिलेदार आणि भाजपच्या विद्यार्थी परिषदेपासून केलेले काम आणि सामान्य कुटुंबातून पुढे आलेले नेतृत्व हे जमेची बाजू सध्या तरी दिसत आहे त्यामुळे दुसऱ्या क्रमांकावर आमदार राम सातपुते यांचे नाव आहे.
          ३) आणि तिसरा पर्याय म्हणून भाजप समोर माळशिरसचे लढवय्ये नेते म्हणून किर्ती असलेले उत्तमराव जानकर यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जात आहे. हा माझ्यासमोरचा तिसरा पर्याय सध्या तरी उपलब्ध आहे त्याचबरोबर धनगर समाजाचे नेते म्हणूनही ते परिचय आहेत सोलापूर मतदारसंघात या समाजाची निर्णय मतदार आहे त्या अनुषंगाने भाजप जनकरताही पर्याय निवडू शकते अशी चर्चा आज दिवसभर सोलापूर मतदारसंघातून फिरत आहे. त्यातच मंगळवेढा तालुक्यातून जानकर यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी ही तेथील समाजाने केली आहे अन्यथा आम्ही भाजपला मतदान करणार नाही असे इशारा संकेत ही दिले आहेत. 
त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून आमदार विजयकुमार देशमुख आमदार राम सातपुते व उत्तमराव जानकर या तीन नावांपैकी एकाची निवड करावी लागणार आहे तरच लढत निर्णायक होईल असा अंदाज बांधला जात आहे.

Post a Comment

0 Comments