लोकपर्व न्यूज नेटवर्क:- लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या राजधानीत वेगवेगळ्या घडामोडी वेगाने घडत आहेत महाविकास आघाडी व महायुतीत ही उमेदवारी मध्ये रस्सीखेच होताना दिसत आहे महायुतीतून महा विकास आघाडीत तर आघाडीतून पुन्हा महायुतीत असे चित्र समोर पहावयास मिळत आहे. काल सोलापूर जिल्ह्यातील अतिशय प्रतिष्ठेचा बनलेला माढा मतदारसंघात खासदार शरद पवार यांनी महाविकास आघाडी तर्फे रासप चे प्रमुख महादेव जानकर यांना उमेदवारी घोषित केले होती.
महादेव जानकर याचे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानावरील संग्रहित छायाचित्र
राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी अचानकपणे वर्षा निवासस्थानी भेट घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महायुतीतच पुन्हा राहण्याचा व स्वीकारण्याचा निर्णय घेतला तसा तो जाहीरही केला आहे त्यांना परभणी लोकसभा मतदारसंघातून संधी देण्यावर खल चालू होता.
वर्षावरील मुख्यमंत्र्याच्या निवासस्थान झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीचे सुनील तटकरे ,भाजपचे प्रसाद लाड, ही उपस्थित होते.
यावेळी महादेव जानकर आणि मानले शरद पवारांचे आभार, जानकर म्हणाले शरद पवारांना राजकारणातील एक उत्तम आदर्श म्हणून पाहतो त्यांनी मला उमेदवारी देऊ केल्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो.
महाविकास आघाडी तर्फे महादेव जानकर यांना उमेदवारी जाहीर झाली होती परंतु त्यांनी महायुतीत राहणेच पुन्हा पसंत केल्याने आता माढा मतदारसंघातून नेमका कोणता उमेदवार महाविकास आघाडी तर्फे पुढे येणार यावर यावर मात्र प्रश्न चांगलाच प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे..? आता माढ्यात कोणाच्या हातात जाणार तुतारी..? आता या प्रश्नाचे उत्तर येणारा काळच सांगेल तोपर्यंत थांबा आणि पाच हीच परिस्थिती उत्पन्न झाली आहे.
0 Comments