अतुल मोरे/लोकपर्व न्यूज नेटवर्क:- सो लापूर लोकसभा मतदारसंघासाठी लोकपर्व न्यूज नेटवर्क ने रविवार 24 मार्च रोजी ५ वाजून १७ मिनिटांनी भाजपकडे सोलापूर लोकसभेच्या उमेदवारी करिता आ. विजयकुमार देशमुख, आ. राम सातपुते आणि उत्तमराव जानकर
या तीन नावाचा पर्याय उरला असून यापैकी एकाची निवड भाजपला करावी लागेल असा सूचक अपेक्षित अंदाज व्यक्त केला होता. आणि आणि २४ मार्च रोजी उशिरा संध्याकाळी नऊच्या दरम्यान भाजप तर्फे सोलापूर साठी आमदार राम सातपुते यांची उमेदवारी घोषित केली सर्वप्रथम हा लोकपर्व न्यूज नेटवर्कचा सूचक अपेक्षित अंदाज खरा ठरला आहे.
सोलापूर लोकसभेसाठी भाजपच्या एका आमदाराचे नाव घोषित झाल्याने सोलापूर लोकसभेसाठीचा मागील एक वैशिष्ट्यपूर्ण इतिहास समोर आला. आणि तो म्हणजे माजी
आमदार... खासदार बनलेले स्व. लिंगराज वल्याळ यांचा.
आमदार १९९० शहर उत्तर ( संग्रहित फोटो)
सोलापूर लोकसभा खासदार १९९६ (संग्रहित फोटो)
ज्यांनी सोलापूरात भाजपाला "विजयी" बनवले. तोच कित्ता आ. राम सातपुते हे गिरवण्यात यशस्वी होणार का हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे. सन १९९० साली शहर उत्तर विधानसभा ( आत्ताचा आ. विजयकुमार देशमुख यांचा मतदारसंघ) मतदारसंघात निवडून येऊन पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचा पहिला आमदार मिळवण्याचा बहुमान मिळवला होता त्याचबरोबर त्यानी १९९६ साली सोलापूर लोकसभा मतदारसंघातून खुल्या प्रवर्गातून खासदारकीची निवडणूक लढवून विजयी झाले होते म्हणजे भाजपचा पहिला आमदार पहिला खासदार होण्याचा बहुमान लिंगराज वल्याळ यांच्या नावावर आहे.
आत्ता २०२४ ची लोकसभा निवडणूक होत आहे सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडून माळशिरसचे भाजपचे
पहिले आमदार राम सातपुते हे लोकसभेसाठी रिंगणात उतरले आहेत.
दुसऱ्यांदा भाजपचा आमदार खासदार साठी मैदानात
माळशिरसचे आ. राम सातपुते
त्यांना खासदार होण्याची संधी पक्षाने दिली आहे. ती संधी आमदार राम सातपुते यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या व मित्र पक्षाच्या आमदाराच्या सानिध्यात पूर्ण करावी लागणार आहे. आमदार राम सातपुते यांची सर्व मदार या विद्यमान आ मदारावर अवलंबून आहे. हे मात्र निश्चित. कारण आमदार राम सातपुते हे पक्षाचा आदेश म्हणून माळशिरस तालुक्यात आमदारकीसाठी उभे राहिले आणि आता सुद्धा पक्षाचा आदेश म्हणून सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उभे राहत आहेत.
आता दुसऱ्यांदा सोलापूर जिल्ह्यात भाजपचा आमदार खासदार होणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
भाजपच्या विजयाची मदार या आजी- माजी आमदारावर राहणार भाजप जिल्हाध्यक्ष आ. सचिन कल्याणशेट्टी, लोकसभा क्लस्टर प्रमुख माजी आ. प्रशांत परिचारक, आ. समाधान आवताडे, आ. यशवंत माने, माजी आ. राजन पाटील, माजी आ. लक्ष्मण ढोबळे, आ. विजयकुमार देशमुख आ. सुभाष देशमुख
0 Comments