राष्ट्रवादी काँग्रेस व पक्ष चिन्ह कोणाचे...? या बाबतीत ला निकाल निवडणूक आयोगाने अजित पवार गटाच्या बाजूने या पूर्वीच दिला आहे. आता विधिमंडळात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कडील आमदार अपात्रतेचा निकाल आज दि. १५ फेब्रुवारी २०२४ रोजी लागणार आहे. काय निकाल लागणार..? या कडे सर्व राजकीय क्षेत्रात नजरा लागल्या आहेत .
सध्या अजित पवार यांच्या कडे मूळ राष्ट्रवादी असल्याने तो सत्तेत सहभागी आहे तर खा. शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी सत्तेविरोधात आहे. नेमके कोणाचे आमदार अपात्र होणार याचा अंदाज बांधला जात आहे.
निकाल अजित पवार गटाच्या बाजूने लागू शकतो..?
या पूर्वी शिवसेना अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निवडणूक आयोगाकडे निकालाचा आधार घेतला होता त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी आमदार अपात्रते प्रकरणी नार्वेकर निवडणूक आयोगाकडे निकालाचा आधार घेऊ शकतात निवडणूक आयोगाकडील निकाल अजित पवार गटाच्या बाजूने लागला आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर
त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी ही निवडणूक आयोगाकडील निकाल महत्त्वपूर्ण ठरणार असून आमदार अपात्रतेचा निकाल अजित पवार गटाच्या बाजूने लागण्याचे संकेत मिळत आहेत. निकालाचे वाचन अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कडून आजच सायंकाळी साडेचार वाजता म्हणजे काही तासांतच होणार आहे.
0 Comments