भगीरथ भालके यांनी निवडणूकीचे रणशिंग फुंकले; केली प्रचाराला सुरुवात...!
राज्यात राजकीय भूकंप घडत असताना सोलापूर जिल्ह्यात ही विविध घडामोडी वेगाने घडत आहेत नुकताच पंढरपूर येथे १३ फेब्रुवारी २०२४ रोजी पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा नवनिर्वाचित मतदारसंघाचे पहिले आमदार कै.भारत भालके यांच्या जयंतीचे औचित्य साधून विठ्ठलचे माजी चेअरमन भगीरथ भालके यांनी सदैव जनतेच्या संपर्कात राहण्यासाठी संपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले. या वेळी भगीरथ भालके यांनी पाठीमागील निवडणूकीचा मागोवा घेतला. व २०२४ च्या विधानसभा निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला.
दिवंगत आमदार भारतनाना यांच्या जयंतीनिमित्त १७ फेब्रुवारी रोजी मंगळवेढा तालुक्यात बैलगाडा स्पर्धा तर पंढरपूर येथे रेल्वे मैदानावर भारत कृषी प्रदर्शन ( कृषी, पशु पक्षी )आयोजित केले असल्याचे जाहीर करून मी निवडणूक लढवणार या पूर्वीच जाहीर केले असून आता सुध्दा जाहीर करतो की
मी आगामी २०२४ ची पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील निवडणूक आर..या..पार... म्हणून लढवणार असल्याचे निक्षून सांगितले.
_______________________________________
परीचारक, आवताडे यांची भूमिका झाकली मूठ सव्वा लाखाची होत आहे..!
मी आवताडेना आमदार केले:- परीचारक
विधानपरिषदेचे माजी आमदार प्रशांत परीचारक यांनी विविध ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात पत्रकारांनी निवडणूकीबाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना म्हणतात की, आ. समाधानदादा सत्ताधारी आहेत त्यांना आमदार मी केले आहे, त्यांच्या विरोधात दोन वेळा निवडणूक ही लढलो आहे , दोन वेळा त्यागही केला आहे. असे सांगितले
प्रत्येक गावात आमचे गट आहेत असे सांगून शेवटी उमेदवारी बाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेणार आहेत असे सांगितले.
____________________
होय.. मला आमदारकीला पांडुरंग परीवाराने, व येथील जनतेने मदत केली:- आ. आवताडे
आमदार समाधान आवताडे यांनी ही पत्रकारांना होय... मला आमदारकीला पांडुरंग परीवाराने व येथील जनतेने आमदारकीला मदत केली आहे जनतेची कामे ही मी करत आहे. असे सांगून
मी ही दोन वेळा निवडणूक लढलो आहे भाजप मोठा पक्ष आहे, पक्षश्रेष्ठीचा निर्णय दोघांनाही मान्य करावा लागेल असे सांगितले.
____________________________________________
अभिजीत पाटील कोणत्या मैदानात उतरणार...? समर्थकांचे लागले लक्ष..!
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन
अभिजीत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस (SP) शरद पवार गटाचे जिल्ह्याचे नेतृत्व स्विकारण्याच्या मनस्थितीत आहेत
अभिजीत पाटील
अभिजीत पाटील यांनी ही गेली सहा महिन्यांपासून मंगळवेढा, सांगोला, माढा तालुक्यातील विविध राजकीय, सामाजिक कार्यक्रमास हजेरी लावून भूमिका मांडत आहेत.
अभिजीत पाटील यांना पंढरपूर -मंगळवेढा, माढा, सांगोला विधानसभा मतदारसंघाचा पर्याय उपलब्ध असल्याने त्यांनी निवडणूकी विषयी कोणतेच भाष्य न केल्याने ते नेमक्या कोणत्या मैदानात मतदार संघात उतरणार ..? या कडे त्यांच्या समर्थकांचे लक्ष लागले आहे.
त्यांच्या बाबतीत माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस (SP) शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीच टेंभुर्णी येथील कार्यक्रमात उमेदवारी चे संकेत दिले होते.
0 Comments