महावितरणचे दुर्लक्ष्य; चळे येथील शेतकरी 'मृत्यू'भीतीच्या छायेत..!
पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील चळे येथील स्मशानभूमी व नदीपात्रा शेजारील असंख्य शेतकरी सध्या 'मृत्यू'भीतीच्या छायेत वावरत आहेत. या बाबत सविस्तर वृत्त असे की , चळे येथील नदीपात्रा शेजारी स्मशान भूमी आहे, अनेक छोट्या - शेतकरी वर्गाच्या बागायती जमीनी आहेत, नदीकाठाला हीरवळ असल्याने अनेक पशुपालक व शेळी- मेंढी पालन करणारे , व शेतमजूर आणि शेतकरी यांची नेहमी स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर वर्दळ असते . या परीसरात महावितरणच्या असंख्य खांबाचे व अतिशय किचकट , जिवघेण्या पध्दतीने विद्युत वाहक 'तारांचे' जाळे विणले गेले आहे. हे सर्व डांब/ खांब वेडेवाकडे व नागमोडी आकारात कललेले आहेत त्यातच कहर म्हणजे त्या सर्व विद्युत खांबावर नियंत्रण ठेवण्यासाठी जो 'विद्युत डेपो' आहे त्याचेही पूर्ण नियंत्रण सुटलेले आहे तो कोणत्याही क्षणी अनपेक्षितपणे कोसळण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर, पशुपालक, सर्व सामान्य शेतकरी एक प्रकारे "मृत्यू" केंव्हाही ओढावू शकेल अशा "मृत्यूभीती" च्या छायेखाली वावरत आहे.
या परीसरातील विद्युत तारा शेतजमीन नांगरताना , मशागत करताना केव्हाही डोक्याला व हाताला स्पर्श होवू शकतो एवढ्या खाली लोंबकळत आहेत. त्यामुळे मृत्यू चे वारे केंव्हाही घोंगावू शकते..? एकूणच काय महावितरणच्या विद्युत तारा, खांब/ पोल ह्या "मृत्यू तुमची वाट पाहत आहे" अशी दिशा देत आहे. त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यानंतरच महावितरणच्या डोक्यात प्रकाश पडणार का..? असा सवाल उपस्थित होत आहे. ही जिवघेणी परिस्थीती अनेक दिवसांपासून 'आ' वासून उभी आहे. स्थानिक व पंढरपूर तालुका महावितरण व्यवस्थापन विभागाने त्वरीत लक्ष देवून सर्व सामान्यांना मृत्यू भीती च्या छायेतून दूर करावे.
फोटो:- चळे ता. पंढरपूर येथील स्मशानभूमी परीसरातील विद्युत तारा, पोल, विद्युत डेपो यांची जिवघेणी परिस्थीती.
0 Comments