LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

सर्वेक्षण चालू; सर्व्हर डाऊन.? प्रगणकाचा त्रास वाढला..!

 
 पंढरपूर प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर उपाययोजनेसाठी आर्थिक निकषावर आधारीत मागासलेपण तपासण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सुचनेनुसार पंढरपूर  तालुक्यात मराठा समाजासह इतर समाजाचेही सर्वेक्षण होत आहे. मराठा सोडून इतर समाजाची माहीत अपलोड होत  असताना  फारसी अडचणी भेडसावत नाहीत . परंतु मराठा समाजाची माहीती अपलोड होत असताना महाराष्ट्रात सगळीकडे एकाच वेळी सर्वेक्षणाबरोबर अपलोड साठी प्रयत्न होत असताना सर्व्हर डाऊन होत असल्याचे चित्र दिसून आले. 
      संपूर्ण राज्यात एकाच वेळी माहिती  संकलित होत असल्याने डाऊनलोड होणा-या विलंबामुळे प्रगणकाचा त्रास वाढला जाणार आहे . प्रत्येक प्रगणकाने ज्या दिवशी माहीती संकलित केली आहे त्याच दिवशी ती माहिती शासनाने नियुक्त केलेल्या संस्थेकडे अपलोड झाली पाहिजे अन्यथा संकलित केलेली माहिती डिलीट होते . पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याच घरी डीलीट झालेली माहिती भरण्यासाठी सर्वेक्षण करावे लागणार आहे..? त्यामुळे वेळ खर्ची पडणार असल्याची माहिती भीती प्रगणाकाडून व्यक्त करण्यात येत आहे त्यामुळे निर्धारित वेळेपेक्षा सर्वेक्षणास जास्त कालावधी लागू शकतो .
          सर्वेक्षणाचे काम  शिक्षक, नगरपालिका कर्मचारी, महसूल कर्मचारी, इत्यादी प्रशिक्षित प्रगणकाडून केले जात आहे. आज २३ जानेवारी  दिवसभरात झालेल्या पहिल्या  दिवशीच्या सर्वेक्षणातून सायंकाळी ६ वाजेपर्यंत  झालेल्या सर्वेक्षणातून पंढरपूर  तालुक्यात फक्त २५ टक्के मराठा कुटुंबाची माहिती  अपलोड झाल्याची  पंढरपूर तालुक्यात समोर आली आहे. याचाच "अर्थ सर्वेक्षण चालू;... सर्व्हर डाऊन"  असा प्रकार समोर येत आहे.

 
 फोटो ओळी:- पंढरपूर तालुक्यातील चळे येथे मराठा  समाजिची माहिती संकलित करताना शासनाने  नेमलेले प्रगणक 

Post a Comment

0 Comments