* ऊस उत्पादकातून चिंतेचे वातावरण; उलट सुलट चर्चा..!
* विस्तारीकरण होवून, गाळप क्षमता वाढूनही उशीर का..?
* ऊस तोडणी यंत्राचा वापर वाढवणे आवश्यक
चळे प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच दोन मोठे व दोन लहान राजवाडे ते म्हणजे विठ्ठल कारखाना व पांडुरंग कारखाना ( मोठे) आणि सहकार शिरोमणी शुगर व सिताराम शुगर हे कारखाने पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी समजले जातात त्यात विठ्ठल व पांडुरंग हे साखर कारखाने मोठे व स्पर्धेतील समजले जात आहेत नव्हे आहेतच..! सध्या गाळप व साखर उत्पादन या बाबतीत स्पर्धा दिसत असून सोशल मिडियातून व समोरा समोर याबाबत चर्चा अधिक होताना दिसत आहे. आणि हे वास्तवातही आहे.
सध्या पांडुरंग व विठ्ठल ह्या कारखान्यानी सहा लाख साखर पोती व त्यापेक्षा अधिक उत्पादन केले असल्याचा समारंभ व महोत्सव साजरा केला जात आहे . परंतु सभासदातून सवाल उमटत आहेत एवढे गाळप व साखर उत्पादन झाले असेल तर आमचा ऊस अजून शेताततचकसा आहे ? कोण म्हणतय माझा आठव्यातील, कोण म्हणतंय माझा सातव्यातील ऊस तसाच आहे .. लागणीची ही त-हा तर खोडवा..निडवा केव्हा तुटणार..? उशीरा येणाऱ्या ऊसाला ज्यादा दर जाहीर केला म्हणून सभासदांचा ऊस मागे राखून गेटकेन ( बिगर सभासदांचा ऊस व बाहेर चा ) ऊस आणने कीतपत योग्य आहे..? असा संशयीत प्रश्न सभासदांना भेडसावत आहे. प्रत्येक कारखान्याचे विस्तारीकरण होवून गाळप क्षमताही वाढली असताना सभासदांचा ऊस गाळप होताना उशीर का होतोय..? असाही प्रश्न ऊस मनाला स्पर्श करून जात आहे.
तालुक्यातील निम्म्याहून अधिक गावातील ऊस उत्पादकांची ही अवस्था असेल तर झालेले गाळप कोणत्या व कोठल्या ऊस उत्पादकाचा गाळप केला. असे ना..ना.. विविध प्रश्न चर्चिले जात आहेत. पाच लाख पोती पूजन झाल्यानंतर पांडुरंग चे चेअरमन प्रशांतराव परीचारक यांनी पांडुरंग मार्फत दुसऱ्या कारखान्याला ऊस देणार ..? असे जाहीर केले होते परंतु त्याचाही परिणाम समोर अजून दिसून आला नाही. त्याचबरोबर ही विठ्ठल चे चेअरमन अभिजीत पाटील यांनी ही बाहेरचा फक्त थोडाच ऊस आणला आहे असे जाहीर केले परंतू नेमका कीती ऊस बाहेरचा आणला हे कळणे सभासदांच्या दृष्टीने महत्त्वाचे पण् मुश्किल बनले आहे. अशा "गुंता - गुंती" मुळे सभासदांच्या मनात आपणही दुसऱ्या कारखान्याला ऊस का देवू नये..? असा प्रश्न मनात आल्यावाचून राहत नाही.
* साखर कारखान्यांना ऊस तोडणी धोरणात बदल करावा
लागेल..!
__________________________________________
सभासदांचा ऊस वेळेवर तोडला जात नसेल तर या पुढे क्षेत्रानुसार अथवा कोणत्या सभासदाने किती ऊस लावावा किंवा एका शेअर्स धारकाने कीती एकर,ऊस लावला जावा असे धोरण निश्चित करावे जेणेकरून ज्या तारखेला ऊस लागवड केली आहे त्या तारखेला किंवा निदान त्या महीन्यात तरी ऊस गाळपास नेला जाईल अशी व्यवस्था निर्माण करावी लागणार आहे तरच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळेल.
* ऊस तोडणी यंत्राचा वापर अधिक करावा लागणार
_________________________________________
सध्या ऊस तोडणी कामगार मिळणे मुश्कील बनत चालले आहे मिळाले तरी टिकून राहत नाहीत . तोडणी कामगार च्या मुकादमा सहीत कामगार फरार होत आहेत . त्यामुळे वाहनधारकाना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे ट्रॅक्टर मालक बाहेर गावची ऊस टोळी करण्यास पुढे येईनात. कारण मुकादमा बरोबर तोडणी कामगार पुरवण्यासाठी केलेले आर्थिक करार वाहन मालकाच्या जिवावर बेतत आहेत काहींनी जीव गमावला आहे. या पार्श्वभूमीवर पुढील हंगामात ऊस तोडणी यंत्राचा वापर वाढवावा लागेल तरच ऊस तोडणी वेळेवर होण्यास मदत होईल.
* अशा विविधांगी चर्चेबरोबर ऊस गाळपात व साखर उत्पादनात अग्रेसर व्हा पण आधी आपापल्या सभासदांचा ऊस गाळप अगोदर व वेळेत करा अशी मागणी सर्वच ऊस उत्पादक शेतकरी वर्गातून होत आहे.
0 Comments