दिनांक - ११/१२/२५
लोकपर्व न्युज नेटवर्क
पंढरपूर तालुक्यातील व महाराष्ट्रातील नामवंत प्रसिद्ध कीर्तनकार ,प्रवचनकार, भागवत कथाकार व संतकृपा वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक श्री ह भ प मनोहर गणपत ठाकरे( महाराज) यांचे आळंदी येथे ४ डिसेंबर रोजी निधन झाले.
वैकुंठवासी ह.भ.प. प्रेमपूर्ती मनोहर गणपत ठाकरे (महाराज)
त्यांच्यावर आळंदी येथेच अंत्यसस्कार करण्यात आले असून त्यांचा दशक्रिया विधी १३ डिसेंबर रोजी आळंदी येथे सकाळी आठ वाजता होणार असून त्यानिमित्त उत्तम महाराज बढे यांचे प्रवचन सेवा होणार आहे.
तेरावे विधी १६ डिसेंबर रोजी श्री विश्वधर्म प्रेम योगानंद गुरुकुल खंडोबा मंदिर आळंदी या ठिकाणी सकाळी आठ ते दहा या वेळेत होणार असून कीर्तन सेवा ह भ प श्री ज्ञानेश्वर महाराज कदम उर्फ (मोठे माऊली) हे सेवा बजावणार आहेत तर १४ वे विधी बुधवार दिनांक १७ डिसेंबर रोजी पंढरपूर येथील त्यांच्या अनिल नगर येथील मूळ निवासस्थानी होणार असून कीर्तन सेवा ह भ प श्री नामदेव महाराज लबडे (पंढरपूरकर) हे सेवा बजावणार आहेत वैकुंठवासी ह भ प मनोहर ठाकरे महाराज यांनी वारकरी संप्रदायाची आजन्म सेवा केली असून ते महाराष्ट्रातील एक नामवंत प्रवचनकार, कीर्तनकार, भागवत कथाकार म्हणून प्रसिद्ध त्यांनी आळंदी येथे मुलांसाठी वारकरी शिक्षण संस्था उभारली असून त्यामध्ये महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी लाभ घेत आहेत त्यांच्या वैकुंठ गमनाबद्दल अध्यात्म, सामाजिक, शैक्षणीक क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे ते पंढरपूरचे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त डॉ प्रशांत ठाकरे यांचे वडील होत. त्यांच्या पक्षात एक मुलगा मुलगी, जावई सुना, नातवंडे असा परिवार आहे. मृत्यू समयी त्यांचे वय ६९ वर्षे होते. त्यांना प्रेममूर्ती या नावाने संबोधले जात आहे.

0 Comments