चळे येथे शिक्षण परिषद उत्साहात
दिनांक :- २९/०९/२०२५
लोकपर्व न्यूज नेटवर्क
आद्यावत शैक्षणिक माहिती द्वारेच पुढील शैक्षणिक वाटचाल गतिमान व दिशा दर्शक ठरणार असून सर्व शाळांनी सर्व प्रशासकीय आवश्यक बाबींची माहीती वेळेत व तत्परतेने देणे अथवा ऑनलाइन भरणे आवश्यक आहे असे आवाहन केंद्र प्रमुख प्रभाकर घाडगे यांनी केले ते पंढरपूर तालुक्यातील चळे जिल्हा परिषद केंद्र शाळेत केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेत अध्यक्षस्थानावरुन व प्रशासकीय कामकाज यावर मार्गदर्शन करताना बोलत होते.
प्रारंभी जिल्हा अंतर्गत बदलीने नव्याने चळे केंद्रामध्ये आलेल्या सर्व शिक्षकाचे स्वागत व इतर केंद्रात बदली झालेल्या शिक्षकांचा निरोप असे दोन्हीही समारंभ परिचयासह करण्यात आले.
या परिषेदेतविद्यार्थी आधार,अपार, विद्यार्थी डाटा, ड्रॉप बॉक्समधील माहिती ,डॉ. जयंत नारळीकर गणित आणि विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम,पावसाळ्यात शाळेत घ्यावयाची दक्षता, इको क्लब,"एक पेड माॅ के नाम"उपक्रम तसेच हरित महाराष्ट्र SHVR रजिस्ट्रेशन , या विषयावर चर्चा करण्यात आली. या विषयांवर शशिकांत कांबळे , ज्ञानेश्वर मोरे, शिवाजी गोरे, सुभाष यलमार, ज्ञानेश्वर विजागत , संभाजी माने यांनी सहभाग नोंदवला.
"विविध संस्थांचे आदर्श शिक्षक पुरस्कार श्री संभाजी माने व श्री मारुती क्षीरसागर यांना मिळाल्याबद्दल व इयत्ता दहावी परीक्षेमध्ये मध्ये कु.हर्षदा सतिश बुवा हिने महत्त्वपूर्ण यश संपादन केल्याबद्दल तिचे पालक श्री व सौ बुवा याचेही सत्कार करण्यात आले".
या शिक्षण परिषेदेत केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चळे शाळेतील सर्व सहशिक्षक यांनी परिश्रम घेतले.
श्री संभाजी माने सर यांनी सूत्रसंचालन केले तर श्री रवींद्र भोसले सर यांनी आभार मानले.

0 Comments