लोकपर्व न्यूज नेटवर्क:-
चळे प्रतिनिधी:-
चळे (ता पंढरपूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेची शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठीत होवून नूतन पदाधिकारी निवडण्यात आले अध्यक्षपदी अतुल बापू सटले तर उपाध्यक्षपदी आण्णा सिध्देश्वर खिलारे यांची अविरोध निवड झाली .
ही निवड १३ डिसेंबर २०२५ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा चळे येथे आयोजीत पालक सभेत केंद्रीय मुख्याध्यापक प्रभाकर घाडगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या पालक सभेतून
बारा व एक शिक्षण प्रेमी सदस्य निवडण्यात आले. इतर सदस्य पुढील प्रमाणे (महिला प्रतिनिधी) सौ अश्विनी महेश मोर, सौ अबोली रामचंद्र कुलकर्णी ,सौ अलका दत्तात्रय माने ,सौ.सोनाली लखन वाघमारे ,सौ चांदणी श्रीकांत पंडित, सौ लक्ष्मी अमोल रोकडे, सौ जस्मिन रियाज मुलाणी, (पुरूष प्रतिनिधी) श्री महावीर तुकाराम मस्के ,श्री जगन्नाथ कोंडीबा शेंबडे,श्री बालाजी संभाजी सरीक, तर शिक्षणतज्ञ सदस्यपदी श्री अतुल परमेश्वर मोरे यांची निवड करण्यात आली या वेळी शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष सज्जन मोरे, नेताजी गायकवाड, गणेश मोरे, तसेच सर्व पालक वर्ग उपस्थित होते. या पालक सभेचे प्रास्ताविक श्री शशिकांत कांबळे सर यांनी केले तर सूत्रसंचालन श्री संभाजी माने यांनी केले.

0 Comments