दिनांक १९/०३/२०२५
लोकपर्व न्यूज नेटवर्क
आ. समाधान आवताडे, आ. राजू खरे, आ. अभीजीत पाटील या आमदारांनी उपस्थित केलेल्या "नमामि चंद्रभागा" प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सविस्तर उत्तर दिले व या पुढील काळात सविस्तरपणे सभागृहात चर्चा करण्यात येईल असे ही सांगितले.
महाराष्ट्र विधिमंडळात १८ मार्च रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान झालेल्या प्रश्नोत्तराच्या तासात पंढरपूर तालुका निगडित असलेले विधानसभा सदस्य समाधाना अवताडे, अभिजीत पाटील, व राजू खरे या आमदारांनी पंढरपूरच्या भीमा नदी संदर्भात भीमा तीर केव्हा स्वच्छ होणार अर्थात "नमामि चंद्रभागा" या अनुषंगाने नदीच्या स्वच्छतेविषयी विविध प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी पर्यावरण मंत्री ना. पंकजा मुंडे यांनी प्रत्यक्ष पाहणी करण्याचा व त्यानंतर निर्णय घेण्याचा विचार उत्तरात बोलून दाखवला त्यापुढे पंकजा मुंडे म्हणाल्या नदीच्या प्रदूषणासंदर्भात कोणतीही तक्रार दाखल झाली नसून फक्त चंद्रभागेच्या पाण्यात घाण पाणी मिसळते अशी नोंद आहे त्याचबरोबर नमामि चंद्रभागा योजनेसाठी ४८ कोटी रुपयांच्या कामाला मंजुरी मिळाली असून ३४ कोटी रुपये दिलेले आहेत पंधरा कोटीची एसटीपी यंत्रणा येत्या १५ एप्रिल पर्यंत पूर्ण होईल असे सांगितले.
"पंढरपूर - मंगळवेढा आ. समाधान आवताडे, मोहोळ- पंढरपूर आ. राजू खरे, माढा- पंढरपूर आ. अभीजीत पाटील यांनी स्वच्छते वषयी प्रश्न उपस्थित करताना पुणे पिंपरी चिंचवड पुणे एमआयडीसी उजनी मध्ये तर पंढरपूर शहरातील सांडपाणी थेट नदीत मिसळते त्याचबरोबर नदा नदीच्या काठावरील कांहीं गावातील कमी अधिक प्रमाणातील सांड पाणी , ड्रेनेजचे पाणी ओढ्याच्या स्वरूपात भीमा अर्थात चंद्रभागा नदीत मिसळते तेव्हा नदीतील पाणी अतिशय अस्वच्छ बनते त्याच पाण्यात वारकरी, भक्तगण स्नान करीत असतात त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल, होऊ शकतो, होत आहे अशा आशयाचे प्रश्न या तीन आमदार महोदयांनी उपस्थित केले".
"या आमदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रभागा प्रदूषणावर सभागृहात चर्चा करण्यात येईल असे आश्वासन दिले."
तर मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की अधिवेशन संपल्यानंतर पंढरपूरला जाऊन जलसंपदा पाण्यापुरवठा नगर विकास संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सोबत घेऊन चंद्रभागेचा आढावा घेऊन ऑडिट करणार असल्याचे आश्वासन दिले.
0 Comments