दिनांक २०/०३/२०२५
लोकपर्व न्यूज नेटवर्क
महाराष्ट्रात येणाऱ्या येत्या शैक्षणिक वर्षापासून नवीन शालेय धोरण स्वीकारण्यात आले असून राज्य शिक्षण मंडळाच्या सर्व शाळांमधून सीबीएसई पॅटर्न लागू करण्यात आला असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या वेळी लिखित स्वरूपात उत्तर दिले. याबाबत राज्याच्या शिक्षण सुकाणू समितीत ही याबाबतीत निर्णय अगोदरच झाला असल्याची माहिती देण्यात आली. गेल्या एक वर्षभरापासून नवीन शैक्षणिक धोरणाविषयी चर्चा सर्व शिक्षण क्षेत्र क्षेत्रात चालू होती नेमका सीबीएसई पॅटर्न केव्हा चालू होणार याची उत्सुकता लागली होती. त्याची उत्सुकता आज शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या उत्तराने संपुष्टात आली त्यामुळे येणाऱ्या सन २०२५- २६ या शैक्षणिक वर्षापासून सर्व राज्य शिक्षण मंडळाच्या अंकित असलेल्या सर्व शाळांना सीबीएससी पॅटर्न प्रमाणे शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येतील.
सीबीएसई पॅटर्न लागू झाल्यामुळे खाजगी आणि सरकारी शाळा असा दुरावा संपुष्टात येणार असून खाजगी शाळांमधून अधिक चांगले शिक्षण सीबीएसई पॅटर्नमुळे मिळत आहे अशी अनेक पालकांची समजूत झाली होती त्यामुळे अनेक आर्थिक दृष्ट्या संपन्न पालकांचा ओढा आपल्या मुलांना खाजगी शाळा कडे पाठवण्यात वाढवला होता परंतु आता सीबीएसई पॅटर्न राज्य शिक्षण मंडळाच्या शाळानाही अर्थात सरकारी मराठी शाळानाही लागू होणार असल्याने सीबीएसई पॅटर्न प्रमाणेच सर्व शिक्षण जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार असल्याने निश्चितच
जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांची व विद्यार्थ्यांची परिस्थिती पूर्वीपेक्षा सुधारणार असा आशावाद या निर्णयामुळे व्यक्त होत आहे.
0 Comments