LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज २९ मार्च शनिवारी तर उद्या रविवारी ३० मार्च रोजी सभापती राम शिंदे सोलापूर- तुळजापूर - पंढरपूर दौऱ्यावर...! या शासकीय - निमशासकीय- खासगी दौरा बाबत कुतूहल

दिनांक २९/०३/२०२५

लोकपर्व न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र  विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतेच २६ मार्च रोजी संपले असल्याने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज  शनिवार दिनांक २९ मार्च रोजी "सोलापूर - तुळजापूर - पंढरपूर" दौऱ्यावर येणार आहेत.   सोलापुरात आल्यानंतर प्रथम तुळजापूरकडे मार्गस्थ होणार आहेत त्यानंतर पंढरपूरकडे येणार आहेत पंढरपूर मध्ये कॉरिडॉर संदर्भात  विठ्ठल मंदिर  प्रशासनातील अधिकारी यांच्या सोबत चर्चा करू शकतात त्यानंतर माजी आ. प्रशांत परिचारक यांच्या निवास स्थानी त्यांची  सांत्वनपर भेट होणार आहे . या भेटीनंतर नीरा नरसिंह पूर येथील लक्ष्मी नृसिंह दर्शन घेतल्यानंतर मुंबईकडे मार्गस्थ होणार आहेत असा दौरा निश्चित आहे.
       तर उद्या रविवारी ३० मार्च रोजी विधान परिषद सभापती राम शिंदे हे सुद्धा सोलापूर - पंढरपूर दौऱ्यावर येणार आहेत . रविवारी ११ वाजता पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहावर आगमन सोमवारी सकाळी सात वाजता विठ्ठल मंदिर आगमन व दर्शन त्यानंतर उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटीकडे मार्गस्थ होऊन तेथील श्री बाळूमामा मंदिर भेट व दर्शन त्यानंतर सोलापूर येथील हेरिटेज गार्डनवर कार्यकर्त्यांशी व पदाधिकारी यांच्याशी चर्चा 
त्यानंतर पुन्हा पंढरपूर पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वठार येथील पंढरपूरचे माजी सभापती प्रा. अँड . वामनराव माने यांच्या अमृत महोत्सवी सत्कार सोहळ्यास उपस्थिती व त्यानंतर शासकीय वाहनाने इंदापूर कडे प्रयाण असा नियोजित दौरा निश्चित आहे या दौऱ्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास भेट  व तेथील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याची पाहणी ही करणार आहेत.
   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या शासकीय- निमशासकीय- खासगी दौऱ्यानिमित्त कुतुहल वाढले आहे त्यातच सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणूक रंगात आली आहे त्या अनुषंगाने हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

Post a Comment

0 Comments