दि. २८/०३/२०२५
लोकपर्व न्यूज नेटवर्क
२७ मार्च २०२५ रोजी सोलापूर येथील डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात संपन्न झालेल्या विश्वस्तांची कार्यशाळा या कार्यशाळेतील शेवटच्या सत्रातील प्रश्नावलीच्या कार्यक्रमात व्यासपीठावर विश्वस्तांच्या शंकांच निरसन करताना
आयुक्त संजय पाईकराव, उपायुक्त प्रवीण कुंभोजकर धर्मदाय वकील संघाचे अध्यक्ष अँड खतीब, अँड. अंबादास रायणी, अँड. अमरीश खोले, अँड. डॉ. सुधाकर मुंढे,
बदलत्या कालावधीचा अंदाज घेत सामाजिक सेवा देण्यासाठी स्थापन झालेल्या सर्व क्षेत्रातील संस्थांनी संस्थेचे कामकाज घटनेप्रमाणे अभ्यास करून नियमितपणे अद्यावत ठेवणे आवश्यक आहे तरच संस्था व विश्वस्त उत्कृष्टपणे कार्य करू शकतील असे प्रतिपादन सोलापूर धर्मादाय संस्था नोंदणी कार्यालयाचे आयुक्त संजय पाईकराव यांनी व्यक्त केले.
सध्या सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नोंदणीकृत धर्मादाय सामाजिक संस्था आहेत परंतु अनेक संस्था अशा आहेत की ज्या अजिबात कार्यरत नाहीत अनेक संस्थांची नोंदणी प्रमाणपत्र आमच्याकडे पडून आहेत उर्वरित कार्यरत असणाऱ्या संस्था सुद्धा अधिक गतिमान पद्धतीने काम करणे आवश्यक आहे तरच ज्य हेतूने संस्था स्थापन केली आहे तो हेतू साध्य होईल आणि एक मोठी सामाजिक चळवळ उभी राहील. सर्व विश्वस्तांनी आपल्या घटनेप्रमाणेच संस्थेचे कामकाज चालवावे व घटनेची नियमावलीची पायमल्ली होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आव्हानही त्यांनी केले.
उपायुक्त प्रविण कुंभोजकर विश्वस्तांना मार्गदर्शन करताना.
यावेळी उपायुक्त प्रवीण कुंभोज कर यांनीही मार्गदर्शन करताना यापुढील प्रत्येक धर्मादाय संस्थेच्या अडचणी व प्रश्न कमीत कमी वेळेत सोडवण्यासाठी सोलापूर सहाय्यक धर्मादायक आयुक्त कार्यालय कटिबद्ध आहे ५४ कर्मचाऱ्यांची आवश्यकता असताना फक्त १८ कर्मचाऱ्यावर कार्यालयाचे कामकाज चालू असून थोड्याच कालावधीत मोठ्या प्रशस्त जागेत संस्थेचे कार्यालय उभारण्यासाठी चा पाठपुरावा शासन स्तरावर चालू आहे . त्याची पूर्तता होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
*'विश्वस्तांचे अधिकार आणि कर्तव्य आणि जबाबदाऱ्या यावर मार्गदर्शन करताना धर्मादाय विदित्य संघ सोलापूरचे अध्यक्ष अँड खतीब वकील*'
* विश्वस्तांच्या कार्यशाळेतील महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडी *
१) सर्व उपस्थितांचे स्वागत उपायुक्त प्रवीण कुंभोजकर यांनी केले.
२) सर्व विश्वस्तासाठी ताणतणावातून मुक्त होण्यासाठी डॉ. नितीन मोघे यांचे मानसिक आरोग्य या विषयावर मार्गदर्शन.
३) धर्मादाय विदित्य संघ सोलापूर चे अध्यक्ष अँड . खतीब यांचे विश्वस्तांचे अधिकार आणि कर्तव्य जबाबदाऱ्या यावर मार्गदर्शन
४) कलम ३६ वर अँड. अंबादास रायवी यांचे मार्गदर्शन
५) अँड. अमरीश खोले यांचे कलम 22 अंतर्गत बदल अहवालावर मार्गदर्शन.
६) श्री अमरीश शेख यांचे कलम ३४ अंतर्गत योग्य वेळेत रिपोर्टर दाखल करणे यासंदर्भात सल्ला.
७) लघुलेखक समीर खान पठाण यांचे बदल अहवाल दाखल करताना त्रुटींची योग्य वेळेत पूर्तता करणेबाबत माहिती.
१) सह. धर्मादाय आयुक्त सोलापूर कार्यालयाचे धर्मादाय आयुक्त संजय पाईकराव मार्गदर्शन करताना.
0 Comments